सरपंच सोडतीनंतर 'कहीं खुशी कहीं गम', इच्छुकांना बसले हादरे

sarpanch reservation announced in grampanchayat election amravati
sarpanch reservation announced in grampanchayat election amravati

अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राजकीय धुरळा उडवून देणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी (ता. दोन) जाहीर होताच अनेक इच्छुकांना चांगलेच हादरे बसले. अनेक ठिकाणी सदस्यांना नव्याने तडजोड करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी महिलांसाठी सरपंचपद निश्चित झाल्याने संबंधित ग्रामपंचायतीत महिलाराज येणार आहे. एकूण 261 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी काढण्यात आले. सोडतीनंतर अनेक ठिकाणी 'कहीं खुशी कहीं गम'चे वातावरण होते. 

मंगळवारी जिल्ह्याच्या अमरावती, तिवसा, मोर्शी, दर्यापूर, चांदूरबाजार, चांदूररेल्वे व धारणी या तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. संबंधित तहसील कार्यालयात ही सोडत काढण्यात आली. अमरावती तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्‍चित करण्यात आले. विशेष म्हणजे 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या असून उर्वरित ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षणसुद्धा मंगळवारी काढण्यात आले. 

अमरावतीचे तहसीलदार संतोष काकडे यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हाताने सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यामध्ये अनु.जाती संवर्गासाठी 16 सरपंचपदे राखीव असून त्यामधील 8 पदे महिलांसाठी राखीव आहेत. अनु.जमातीसाठी एकूण 4 पदे असून त्यापैकी 2 महिला, नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी 16 जागा असून त्यापैकी 8 पदे महिलांसाठी राखीव, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 23 जागा असून त्यापैकी 12 ठिकाणी महिला सरपंच होणार आहेत. तहसीलदार संतोष काकडे, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, नायब तहसीलदार गोपाल कडू, प्रवीण देशमुख, दिनेश बढिये आदी मान्यवर उपस्थित होते.

अनु.जाती प्रवर्ग -
बोडणा, पोहरा, मासोद, अंजनगावबारी, कस्तुरा मोगरा, भानखेडा खु., माहुली जहागीर (महिला),  शिराळा (महिला), देवरा (महिला), नांदगावपेठ (महिला), शेवती जहॉंगीर, नांदुरा लष्करपूर (महिला), सालोरा खुर्द (महिला), गोपाळपूर (महिला), कामुंजा (महिला)

अनु.जमातीसाठी -
बोरगाव धर्माळे (महिला), रेवसा, पिंपरी, मलकापूर (महिला). 

नागरिकांचा मागासप्रवर्ग -
वडगावमाहुरे (महिला), केकतपूर, पुसदा, सावंगा (महिला), नया आकोला (महिला), पिंपळविहीर (महिला), बनारसी (महिला), चिचखेड, काटआमला, नांदुरा पिंगळाई, पिंपळखुटा, कठोरा बु. नांदुरा बु. (महिला), टाकळी जहॉंगीर (महिला), डिगरगव्हाण (महिला). 

हेही वाचा -

सर्वसाधारण प्रवर्ग -
इंदला, उदखेड, वडगाव जिरे, भानखेडा बु. (महिला), यावली शहीद (महिला), वाघोली (महिला), कापूसतळणी, डवरगाव (महिला), कठोरा गांधी (महिला), करजगाव, ब्राह्मणवाडा भगत, अंतोरा, सावर्डी (महिला), ब्राह्मणवाडा गो. (महिला), रोहनखेडा (महिला), सुकळी, देवरी (महिला), जळका, आमला, लोणटेक (महिला), कुंड सर्जापूर, धानोरा कोकाटे (महिला), टेंभा (महिला)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com