sarpanch selection process on 11 to 16 february in amravati
sarpanch selection process on 11 to 16 february in amravati

अमरावतीत निवडणुकीची रणधुमाळी, ग्रामपंचायतींमध्ये होणार राजकीय उलथापालथ

अमरावती : ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून गुरुवारपासून (ता.11) सुरू होणाऱ्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणूक प्रक्रियेमुळे चांगलीच राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. 11 ते 16 फेब्रुवारीपर्यंत सरपंच, उपसरपंचांची निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार असून गुरुवारी जिल्ह्यातील 130 ठिकाणी सरपंच, उपसरपंचांची 'ताजपोशी' होणार आहे. 

जिल्ह्यातील 553 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला घेण्यात आली. 2 फेब्रुवारीला सरपंचपदांचे आरक्षण काढण्यात आले. 11 फेब्रुवारीला प्रथम दिवशी 130 ठिकाणी सरपंच, उपसरपंचांची निवडणूक होणार आहे. 
अमरावती तालुक्‍यातील ब्राह्मणवाडा गोविंदपूर, शेवती जहागीर, केकतपूर, मलकापूर, पुसदा, नया आकोला, बोरगाव धर्माळे, वडगाव माहुरे, यावली शहीद, डवरगाव. दर्यापूर तालुक्‍यातील जैनपूर, रामतीर्थ, पनोरा, कळमगव्हाण, भामोद, सामदा, माहुली धांडे, करतखेडा, सासन रामापूर, नांद्रूण. 

भातकुली तालुक्‍यातील बोरखडी खुर्द, विर्शी, जसापूर, दाढी, वाठोडा शुक्‍लेश्‍वर, कामनापूर, कवठा बहाळे, उत्तमसरा, नांदेड खुर्द, म्हैसपूर. 
चांदूररेल्वे तालुक्‍यातील शिरजगाव कोरडे, टिटवा, बग्गी, बोरी, बासलापूर, मंजरखेड दानापूर, धानोरा मोगल, चिरोडी, किरजवळा. तिवसा तालुक्‍यातील दिवाणखेड, मार्डी, सार्सी, मूर्तिजापूर तरोडा, मार्डा, बोर्डा, कुऱ्हा, शिरजगाव मोझरी. 

मोर्शी तालुक्‍यातील शिरूर, राजूरवाडी, कवठाळ, सिंभोरा, नशीरपूर, पार्डी, येरला, लाडकी बु., खोपडा, निंभी. धारणी तालुक्‍यातील मांगिया, चेंडो, हिराबंबई, रंगुबेली, रेहट्या, गोलाई, दादरा. 
चांदूरबाजार तालुक्‍यातील जसापूर, कुऱ्हा, हिरूरपूर्णा, शिरजगावकसबा, देऊरवाडा, काजळी, माधान, सुरळी, ब्राह्मणवाडा पाठक, ब्राह्मणवाडा थडी. 
चिखलदरा तालुक्‍यातील आमला वि., खिरपाणी, आमझरी, काकादरी, आढाव, खटकाली. वरुड तालुक्यातील आमनेर, घोराड, देऊतवाडा, पवनी, हातूर्णा, कुरळी, इत्तमगाव, पुसला, मांगरुळी, वडाळा. 
धामणगावरेल्वे तालुक्‍यातील जुना धामणगाव, अशोकनगर, घुसळी कामनापूर, हिंगणगाव, वाघोली, निंभोरा राज, आसेगाव, वडगाव राजदी, जळगाव आर्वी, तिवरा. नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील कंझरा, शिरपूर, वडुरा, पळसमंडळ, पिंपरी गावंडा, फुल आमला, धामक, खानापूर, येणस, वाटपूर. 
अंजनगावसुर्जी तालुक्‍यातील लाखनवाडी, कोतेगाव, कोकर्डा, खामपूर, पिंपळगव्हाण, धनेगाव, कमालपूर तरोडा, विहिगाव, घोडसगाव. अचलपूर तालुक्‍यातील वझ्झर, पांढरी, सावळापूर, खैरी, निंभारी, येसूर्णा, कुष्ठा खू., कुष्टा बू., शिंदी बू., वडनेर भुजंग येथील सरपंच पदाच्या निवडणुका होणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com