सरपंच विनोद पारधींनी केला सटवाला स्मार्ट ग्राम करण्याचा संकल्प

 डिलेश्वर पंधराम
बुधवार, 20 जून 2018

गोरेगाव (गोंदिया) : तालुक्यातील सटवा येथील सरपंच विनोद पारधी हे कला शाखेत पदवीधर असुन लहानपणापासुन समाजकारण करण्याची आवड होती यामुळे ऩोकरी न करता शेती व्यवसायाबरोबर समाज कार्य सुरु केले.

२०१७ मध्ये ग्रामपंचायत सटवा च्या  निवडणुका लागल्या यात सरपंच पदाकरीता भारतीय जनता पक्षाला समर्थन करुन विनोद पारधी यांनी निवडणुक जिंकली व १७ नोव्हेंबरला सरपंच पद हाती घेतला. 

गोरेगाव (गोंदिया) : तालुक्यातील सटवा येथील सरपंच विनोद पारधी हे कला शाखेत पदवीधर असुन लहानपणापासुन समाजकारण करण्याची आवड होती यामुळे ऩोकरी न करता शेती व्यवसायाबरोबर समाज कार्य सुरु केले.

२०१७ मध्ये ग्रामपंचायत सटवा च्या  निवडणुका लागल्या यात सरपंच पदाकरीता भारतीय जनता पक्षाला समर्थन करुन विनोद पारधी यांनी निवडणुक जिंकली व १७ नोव्हेंबरला सरपंच पद हाती घेतला. 

गावाचा विकास, स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्न सोडविणे, रोजगार निर्माण करणे, गावातील युवक, प्रौढ यांना एक छताखाली आणणे, गाव भक्तीमय करणे, वाचणालय, पथदिवे, झाडे लावणे, ग्रामपंचायत सुशोभीत व  फळबाग तयार करुन  स्मार्टग्राम करण्याचा संकल्प सरपंच विनोद पारधी यांनी घेतला. 

सर्वप्रथम युवकांना एकत्र करुन स्वच्छ भारत मिशन योजना अमलात आणुन गावातील केरकचरा , प्लास्टीक पिशव्या गोळा करण्यास सुरुवात केली घरोघरी प्रत्येक कुटुंब निहाय शौचालय इमारत बांधकाम करण्यास प्रावूत्त केल्याने उघड्यावर शौचविधी बंद केला सांडपाणी वाहुन नेणा-या सिंमेट काक्रींट नाल्या तयार करुन त्यावर झाकण तयार केले गावात पिण्याचे पाणी स्त्रोत १६ हातपंप, ४० खासगी विहीरी, ०२ शासकीय विहीरी असुन पाणी टंचाई होवु नये म्हणुन विहीरीची गाळ काढले व हातपंपाना लागणारे साहीत्य मिळवुन घेतल्याने पाणी टंचाईवर मात करता आले प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, सबरी घरकुल योजना चे घरकुल गरजु लाभार्थ्यांना मिळत आहे महिला, पुरुष मजुरांना कामाचा लाभ देण्यासाठी मग्रारोहयो व्दारे रानतलाव खोलीकरणासाठी २१ लाख ७६ हजार ८८० रुपये मंजुर करुन २०४ मजुरांना काम देण्यात आले  पर्यावरण समतोल राखण्यासाठी ५ हजार वूक्षलागवड करण्यात येणार आहे गावक-यांचा मुख्य व्यवसाय शेती अाहे पण सिंचनाचा प्रश्न आहे यावर तोडगा निघावा म्हणुन कंटगी मध्यम प्रकल्पाचे पाणी कालव्याव्दारे रानतलावात सोडणे त्यातुन गावतलावात आणल्यास सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे आमदार विजय रहांगडाले यांच्या  मध्यस्तीने हा प्रश्न सोडविला जाणार आहे. 

३०/५४  निधीव्दारे मुख्य रस्ता डव्वा, सटवा, चिचगावटोला, सिलेगाव, मेंगाटोला, पाथरी, गोरेगाव रस्त्याचे बांधकाम मंजुर झाल्याने लवकरच बससेवा सुरु करण्यात येणार आहे गावातील महीला बचत गटांना उमेद सी जोडण्यात आले आहे सटवा स्मार्ट गाव करण्यासाठी भक्तीमय वातावरण निर्माण करुन ३ भजनमंडळे तयार करण्यात आली या मंडळाव्दारे गुरुवार, शनीवारला मंदीरात किर्तन माला, भजने आयोजीत केल्या जातात, ग्रामपंचायत कार्यालयात आर ओ बसविणे, नळयोजना तयार करणे, प्रत्येक वार्डातील मुख्य चौकात कचराकुंड्या बसविणे, घंटागाडी विकत आणणे, घनकच-यापासुन महीला बचत गटामार्फत गांडुळ खत तयार करणे, गावतलावांची खोलीकरण करणै व सुरक्षा भिंत तयार करणे , मुख्य चौकात उच्च दाबाचे  दिवे बसविणे, शेती बरोबर दुग्ध व्यवसायात वाढ करण्यासाठी मार्गदर्शक शिबिराचे आयोजन करणे, रोजगार निर्मिती करणे, वूक्षलागवड करणे, शासकीय योजनांची माहीती पात्र लाभार्थ्यांना मिळवुन देणे, वाचनालय तयार करण्याचे प्रस्ताव असल्याने सटवा हे गाव स्मार्ट गाव करणारच असे सरपंच विनोद पारधी यांनी सांगितले.

सटवा स्मार्ट गाव करण्यासाठी उपसरपंच ओमप्रकाश चौधरी, सदस्य गणराज रहांगडाले, ओमेंद्र ठाकुर, रामेश्वरीताई ठाकुर, गिताबाई रहांगडाले,चित्ररेखा रहांगडाले, सुर्यकांता चौधरी ,  ग्रामसेविका कु सविता पाटील, भाकचंद रहांगडाले, मयुर कोल्हे, सुभाष ठाकुर, राजेश रहांगडाले, नुतन बिसेन  व गावकरी यांचे सहकार्य लाभत असल्याची माहीती सरपंच विनोद पारधी यांनी दिली. 

गावातील महीला बचत गट, गुरुदेव सेवा मंडळ, युवक मंडळ यांच्या सहकार्याने सटवा हे गाव स्मार्ट गाव म्हणून लवकरच दिसणार आहे.
- विनोद पारधी, सरपंच सटवा

Web Title: sarpanch vinod paradhi takes initiate for create smart gram satwala in gondiya