esakal | महिलांनी महिलांसाठी बनवली संस्था; घरोघरी देतात सोलर प्रकाश
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांनी महिलांसाठी बनवली संस्था; घरोघरी देतात सोलर प्रकाश

महिलांनी महिलांसाठी बनवली संस्था; घरोघरी देतात सोलर प्रकाश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकींना घरोघरी दिवा लावण्याचे काम मिळाले. हा ज्ञानाचा आणि सोलरवर चालणाऱ्या विजेचा (Solar light bulb) दिवा. घरोघरी दिवे लावण्याचा प्रकल्प सुरू केला देवळी तालुक्यातील कवठा झोपडी येथील महिलांनी. तेजस्वी सोलर एनर्जी (Bright solar energy) मागासवर्गीय संस्था स्थापन करण्यात आली आणि त्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या (Institutions created by women for women) संचालिका आहेत संगीत वानखेडे आणि उपसंचालिका आहेत अर्चना बलवीर. (Savitri's-woman-gave-solar-light-to-the-house-in-wardha-district)

कवठा गाव लहान असले तरी येथे नवनवीन प्रयोग केले जातात. त्याचा फायदा येथील महिलांना होतो. संगीता वानखेडे आणि सहकारी महिलांनी सुरुवातीला बचत गटाची संकल्पना पुढे आणली. देवळी तालुक्यातील कवठा झोपडी गावात उमेद अभियानांतर्गत बचत गट व ग्रामसंघाची स्थापना केली. महिलांच्या एकत्रीकरणातूनच उद्योगाची संकल्पना पुढे आली.

हेही वाचा: सहा वर्षांनी उघडले मदिरालयाचे द्वार; मद्यपींमध्ये आनंद

तेजस्वी सोलर एनर्जीची सुरुवात मार्च २०१८ मध्ये झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या प्रयत्नातून समाजकल्याण विभागामार्फत नावीन्यपूर्ण योजनेतून ग्रामसंघासाठी २ कोटी ६२ लाखांचे भागभांडवल मिळाले. यापैकी तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय संस्थेला एक कोटी ८३ लाख रुपये उपलब्ध करून दिले. तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक प्रकल्पाची नोंदणी को-ऑपरेटीव्ह सोसायटी अंतर्गत झाली, असे संगीता वानखेडे यांनी सांगितले.

वर्धा जिल्हा हा नेहमीच बचतगटांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी अग्रेसर राहिलेला आहे. देवळी तालुक्यातील कवठा झोपडी येथील तेजस्वी सोलर एनर्जी प्रकल्पामार्फत सोलर पॅनल, सोलर स्ट्रीट लाइट, सोलर होम लाइट बनविण्यात येत आहेत. महिलांना शाश्वत रोजगार मिळून देणे हा या प्रकल्पाचा उदेश आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उत्पादनात वाढ होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, असे वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी सांगितले.

हेही वाचा: सर्वांना खुणावताहेत रानभाज्या; स्वादासोबत देतात आरोग्य

महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बनवलेली संस्था गावातील तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय संस्था म्हणजे स्वतः महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बनवलेली महिला औद्योगिक को-ऑपरेटीव्ह संस्था आहे.
- संगीता वानखेडे, संचालिका

महिलांना शाश्वत रोजगार

कवठा (झोपडी) या गावात कंपनीच्या इमारतीचे पूर्णपणे बांधकाम झाले आहे. त्याचे पॅनल तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच सोलर पॅनल, सोलर स्ट्रीट लाइट व सोलर होम लाइट बनविण्याचे कामही महिला करीत आहेत. महिलांव्दारा संचालित या कंपनीला नुकतेच ४० लाखांचे ग्रामीण भागात स्ट्रीट लाइटचा पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले. या प्रकल्पामुळे महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा: सोशल मीडियावर राज्य करतात हे खेळाडू; इंस्टाग्रामवरून कमावतात इतके कोटी

महाराष्ट्रातील पहिलेच आणि देशातील दुसरे उदाहरण

सोलर पॅनल निर्मितीचे काम देशात साधारणतः: मोठ्या कंपन्यांमार्फत केले जाते. मात्र, वर्धा जिल्ह्यातील फारसे शिक्षण न झालेल्या बचत गटाच्या महिलांनी सोलर पॅनल निर्मितीसारख्या तांत्रिक कामामध्ये प्रावीण्य मिळवून उद्योगात भरारी घेतली. ग्रामीण भागातील महिला बचत गटामार्फत सोलर पॅनल निर्मितीचा उद्योग उभारणे हे महाराष्ट्रातील पहिलेच आणि देशातील दुसरे उदाहरण आहे.

(Savitri's-woman-gave-solar-light-to-the-house-in-wardha-district)

loading image