esakal | सर्वांना खुणावताहेत रानभाज्या; स्वादासोबत देतात आरोग्य
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वांना खुणावताहेत रानभाज्या; स्वादासोबत देतात आरोग्य

सर्वांना खुणावताहेत रानभाज्या; स्वादासोबत देतात आरोग्य

sakal_logo
By
लीलाधर कसारे

भामरागड (जि. गडचिरोली) : पावसाळा सुरू झाला की, रानभाज्यांचाही हंगाम (Legume season) सुरू होतो. सध्या रानात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवल्या आहेत. स्वादासोबत आरोग्य देणाऱ्या व अनेक आजारांपासून वाचविणाऱ्या रानभाज्यांचे सेवन करणे अत्यावश्यक झाले आहे. जंगलात, बांधावर, माळरानात अनेक रानभाज्या दिसून येतात. यात अनेक औषधी गुणधर्मही असतात. (It-is-essential-to-consume-legumes-that-protect-against-diseases)

कुड्याची भाजी, तरोटा भाजी जंगलालगतचे आदिवासी आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून वापर करतात. ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असतात. त्यांच्या जुन्या पिढीतील भाज्यांचे हे ज्ञान नव्या पिढीतही कायम आहे. या वनस्पती दैनंदिन खाद्यान्नातील अविभाज्य घटक आहेत. या वनस्पतींपैकी काहींचा वापर ते विशिष्ट सणादरम्यान, तर काही विशिष्ट दिवशीच खातात. यावरून निसर्गाशी जुळलेली त्यांची नाळ अधोरेखित होते. या वनस्पतींपासून आदिवासी विविध पदार्थ बनवितात.

हेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून, वरण, भजी आदी खाद्यान्न यापासून तयार केले जाते. एवढेच नव्हे तर पोळ्यांसाठीही याच वनस्पती वापरतात. काही भाज्या थंड तर काही उष्ण गुणाच्या असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात. कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो.

रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते. कोंब आलेली भारंगी, शेकट्यांच्या भाजीमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू वा कुवाळूची भाजी गवतासारखी असते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात. हा फरक सरावाने ओळखता येतो, अशी माहिती रानभाज्यांचा महोत्सव आयोजित करणारे यशोधन देशमुख देतात.

हेही वाचा: पेरणीसाठी गेलेली आई परतलीच नाही, शेवटी मृतदेह लागला हाती

शेवळे म्हणजे पांढऱ्या अळींबीचाच एक महत्त्वाचा प्रकार आहे. यात सेक्रोमायसिस इस्ट अधिक असते. अन्य भाज्यांमध्येही या इस्टचा नैसर्गिक थर असतो. सेक्रोमायसिसच्या अतिरिक्त थरामुळे घशात खवखव होणे, खाज आल्यासारखे वाटते. त्यामुळे या भाजीसोबत विक्रीला ठेवली जाणारी फळेही विकत घ्यायला हवीत.

या भाज्यांमध्ये लोह, खनिज यांचा भरपूर साठा असल्याने त्यांचा आस्वाद पावसाळ्याच्या दिवसांत शाकाहारी वा मांसाहारी अशा कोणत्याही जेवणासोबत घ्यायला हवा. यामध्ये चावावेल, कार्टुल, शेऊळ, शेवाळे, कुड्याचे फूल, चार, घोळ, रताळ्याचे कोंब, भोपा, चायवळ, टेकोडे, काटवल आदींचा समावेश होतो.

हेही वाचा: सहा वर्षांनी उघडले मदिरालयाचे द्वार; मद्यपींमध्ये आनंद

वाढते रोगप्रतिकारशक्ती

पावसाळ्याच्या दिवसांत जंगलात विविध प्रकारच्या रानभाज्या मिळत असतात आणि प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नागरिक त्या सेवन करत असल्याने त्यांच्यामध्ये विपुल प्रमाणात रोगप्रतिकारकशक्ती दिसून येते. या भाज्या रसायन विरहित पदार्थ असल्याने शरीरासाठी उपयुक्त असतात. म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सर्वांनी या भाज्यांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन प्रा. डॉ. कैलास निखाडे यांनी केले आहे.

(It-is-essential-to-consume-legumes-that-protect-against-diseases)

loading image