एससी, ओबीसीच्या जागांमध्ये वाढ

राजेश प्रायकर/नीलेश डोये - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

प्रभागासाठी एसटी, खुल्या वर्गाच्या जागांत घट - अनेकांची राजकीय समीकरणे बिघडणार 

नागपूर - लोकसंख्येनुसार महापालिकेच्या सदस्य संख्येमध्ये वाढ झाली. त्यामुळे अनेकांना गुदगुल्या झाल्या. परंतु, अनुसूचित जमातीसोबत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित जागांमध्ये घट झाली असून एससी व ओबीसींसाठी जागा वाढणार असल्याची उच्चपदस्थ सूत्राने नमूद केले. त्यामुळे अनेकांची राजकीय गणिते बिघडणार असून राजकीय पक्षांनाही धक्का बसणार आहे. 

 

प्रभागासाठी एसटी, खुल्या वर्गाच्या जागांत घट - अनेकांची राजकीय समीकरणे बिघडणार 

नागपूर - लोकसंख्येनुसार महापालिकेच्या सदस्य संख्येमध्ये वाढ झाली. त्यामुळे अनेकांना गुदगुल्या झाल्या. परंतु, अनुसूचित जमातीसोबत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित जागांमध्ये घट झाली असून एससी व ओबीसींसाठी जागा वाढणार असल्याची उच्चपदस्थ सूत्राने नमूद केले. त्यामुळे अनेकांची राजकीय गणिते बिघडणार असून राजकीय पक्षांनाही धक्का बसणार आहे. 

 

महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार असून चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे एकूण ३८ प्रभागांमध्ये चौरंगी लढती बघायला मिळणार आहे. शासनाने महापालिकेची सदस्य संख्या ६ ने वाढवून १५१ केली आहे. यात हुडकेश्‍वर, नरसाळाही सामील करण्यात  आले आहे. या क्षेत्रांतील नागरिकांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी सदस्य संख्या वाढ करण्यात  आली आहे. सदस्य संख्येत वाढ झाल्याने सर्वच वर्गातील प्रतिनिधींनीच्या संख्येत वाढ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. ओबीसी, एससी व खुल्या प्रवर्गातील नगरसेवकासाठी आरक्षित जागेच्या संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, एसटी व खुल्या प्रवर्गातील नगरसेवकांसाठी आरक्षित जागेच्या संख्येत घट झाल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्राने सांगितले. सध्या एसटी नगरसेवकांची सख्या १३ असून पुढील निवडणुकीसाठीसाठी १२ झाली आहे. खुल्या प्रवर्गातील नगरसेवकासाठी आरक्षित जागेत एकने घट झाली असून ६८ करण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गातील नगरसेवक संख्येत २ तर एससीच्या संख्येत सहाने वाढ झाली आहे. २४ लाख ४७ हजार ४९४ लोकसंख्या असून या आधारेच प्रवर्गातील नगरसेवकांची संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. यात ५० टक्‍के जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. 

 

        अशी असेल संख्या (१५१)   विद्यमान संख्या  (१४५)

एससी     -   ३०    २४ 

एसटी     -     १२   १३

ओबीसी    -     ४१   ३९

खुला प्रवर्ग -   ६८   ६९

 

नामनिर्देशित जैसे थे 

महापालिकेत नामनिर्देशित सदस्यांची संख्या सद्य:स्थितीत पाच आहे. सदस्य संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नामनिर्देशित सदस्यवाढीची शक्‍यता होती. मात्र, शासनाकडून या संख्येत कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

आरक्षण 

जातीय लोकसंख्येच्या आधारे प्रत्येक भागात प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. त्यानुसार एससी आणि एसटीचे आरक्षण निश्‍चित करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात ओबीसी वर्गासाठी एक जागा असणार आहे. तीन प्रभागांत ओबीसीसाठी दोन जागा असतील. तीन जागांसाठी चिठ्ठी काढण्यात येणार आहे. ३० प्रभागांत खुल्या वर्गातील दोन सदस्य असतील.

Web Title: SC, OBC seats in addition to the