esakal | वणीत सुगंधित तंबाखूची चढ्या दरात विक्री; अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

scented tobacco caught in yavatmal district

वणी शहरात बेरोजगार युवकांनी ठिकठिकाणी पानटपरीसारखे लहानसहान व्यवसाय थाटले आहेत. खर्रा खाणे युवकांची फॅशन झाली आहे. खर्रा बनविण्याकरिता सुगंधित तंबाखूची नितांत गरज आहे.

वणीत सुगंधित तंबाखूची चढ्या दरात विक्री; अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून दुर्लक्ष

sakal_logo
By
तुषार अतकारे

वणी (जि. यवतमाळ),: महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू व गुटख्यावर बंदी घातली आहे. मात्र, वणी शहरात खुलेआम सुगंधित तंबाखू व गुटख्याची विक्री होताना दिसत आहे. टाळेबंदीच्या कालखंडात तंबाखू व्यापाऱ्यांनी चांगलेच हात धुवून घेतले आहेत. अन्न व औषधी प्रशासन विभागाने डोळ्यावर काळी पट्टी बांधली की काय, असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

वणी शहरात बेरोजगार युवकांनी ठिकठिकाणी पानटपरीसारखे लहानसहान व्यवसाय थाटले आहेत. खर्रा खाणे युवकांची फॅशन झाली आहे. खर्रा बनविण्याकरिता सुगंधित तंबाखूची नितांत गरज आहे. याकरिता मजा 108, 120 व 160 असा सुगंधित तंबाखू वापरण्यात येतो. तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामामुळे महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूसह गुटख्यावर बंदी आणली आहे. 

हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मानवी मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

लगतच असलेल्या आंध्र प्रदेश व तेलंगणातून चोरट्या मार्गाने बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची सर्रासपणे तस्करी होत असून, येथील काही व्यापारी त्यात लिप्त आहेत. तर बनावट मजा कंपनीचा जर्दा येथील चिखलगाव परिसरात निर्माण करण्यात येत असल्याचा संशय पोलिस प्रशासनाला आहे.

वणी पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी एका तंबाखू व्यावसायिकांवर कारवाई केली होती. लाखो रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आला होता. सध्यस्थितीत येथील बसस्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ, गांधी चैक व शहरातील ठराविक झोपडपट्टीत बंदी असलेला तंबाखू साठविण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. तर जुन्या बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी 'दीपक कि रोशनी में' सुगंधित तंबाखूची तस्करी करण्यात येत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. शहरातील पानटपरीधारकांना जर्दा पोहोचविण्याकरिता काही युवक कार्यरत आहेत.

क्लिक करा - सव्वा महिन्याच्या बाळाच्या खुनाचे रहस्य कायम; कुटुंबीयांनी पित्याला दिली घटनेची माहिती

टाळेबंदीच्या कालखंडात दर गगनाला

टाळेबंदीच्या कालखंडात सुगंधित तंबाखूचा दर गगनाला भिडला होता, तर पाच रुपयांची तंबाखू पुडी 50 रुपयाला विकली गेली, तर खर्रा हा शंभरीवर पोहोचला होता, हे वास्तव विसरता येणार नाही. विशेष म्हणजे आजसुद्धा चढ्यादराने प्रतिबंधित तंबाखूची विक्री अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून होत आहे. मात्र, कारवाई करण्याचे सौजन्य संबंधित विभाग दाखवीत नसल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

संपादन = अथर्व महांकाळ 

loading image