कळमेश्‍वर ः शिष्यवृत्ती वाटपप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी पौर्णिमा मेश्राम.
कळमेश्‍वर ः शिष्यवृत्ती वाटपप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी पौर्णिमा मेश्राम.

कॅनडातील फाउंडेशनकडून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 

कळमेश्वर (जि.नागपूर) कळमेश्वर नगर परिषद महाविद्यालयात शिक्षण घेतलेले व सध्या कॅनडा या देशात स्थायिक झालेले राज राजेश्वर उतखेडे यांनी "उतखेडे फाउंडेशन'ची स्थापना करून ते नगर परिषद महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करतात. प्रतिकूल परिस्थितीशी कोणी झुंजत असेल तर त्याला प्रोत्साहन लाभावे, यासाठी उतखेडे फाउंडेशन हे कार्य करते. मानवतेचे मूल्य कृतीने जोपासणाऱ्या उतखेडे यांच्यातील माणुसकीचे असे लोभस दर्शन घडते. कळमेश्वर नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उतखेडे फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती वाटप नुकतेच करण्यात आले. 
महाविद्यालयातील आठवी ते बारावीमध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी एक लाख आठ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते धनादेशाद्वारे करण्यात आले. त्यामध्ये प्राप्ती मानकर, वेदांती बोंद्रे, सूरज खोडे, विभांशू चोपडे, वृषाली दोडनवार, नीलिमा बांबल, दुर्गा पांडे, स्वाती राऊत, जयश्री गोतमारे आदींचा समावेश होता. 
अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी स्मिता काळे होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नीरीचे वैज्ञानिक प्राचार्य डॉ. गजानन खडसे होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना "जलवायू व पर्यावरण' हा विषय आपण किती गांभीर्याने घ्यावयास हवा, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाढता ऊर्जावापर, कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वी तापत आहे. या जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम हवामान बदलाच्या रूपाने दिसू लागलेले आहेत. ते रोखण्यासाठी उत्सर्जन कमी करण्याची गरज आहे. यातूनच पर्यावरणाचा असमतोल होऊन पुराची भीती निर्माण झाली आहे. हवामानबदलामुळे आपल्या जीवनावर व प्रत्येकाच्या भविष्यावर होणाऱ्या परिणामांविषयी त्यांनी चिंता डॉ. खडसे यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे त्यांना अपेक्षित असणारे कार्य नवीन पिढीच्या हाताने घडावे व त्यांचे जीवन सुखकर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. खडसे हे नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातीलच माजी विद्यार्थी आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा मेश्राम यांनी केले. उतखेडे फाउंडेशन शिष्यवृत्ती पुरस्कारामुळे कितीतरी गरीब व हुशार मुले चांगले शिक्षण घेऊन शिकत आहेत. याचा शाळेला अभिमान आहे व निरंतर हा प्रयोग चालू राहील, अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमात पाहुणे म्हणून जे. एस. डब्ल्यू. कंपनीचे सीएसआर हेड प्रशांत कलशेट्टी, माजी उपप्राचार्य अरविंद पवार, शिक्षक-पालक प्रतिनिधी अध्यक्ष गजानन लांबसे, शाळेचे उपप्राचार्य दादाराव जांभरुणकर, पर्यवेक्षिका प्रीतीछाया गोखे हे उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com