School : "झाडे जगवा, बक्षीस मिळवा" योजनेतून वटवृक्षांची जोपासना; विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वाट

Distribution of prizes to students
Distribution of prizes to students

महूद : सांगोला तालुक्यातील तरंगेवाडी अंतर्गत असलेल्या सांगोलकर-गवळीवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पर्यावरणप्रेमी शिक्षक खुशालद्दिन शेख यांनी स्वखर्चातून गतवर्षी ५०१ वटवृक्षांची लागवड विद्यार्थ्यांच्या मदतीने केली होती. ही झाडे जगविण्यासाठी "झाडे जगवा,बक्षीस मिळवा"हा उपक्रम त्यांनी राबवला.

झाडांची उत्तम जपणूक करणाऱ्या तरंगेवाडीमधील २१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांच्या शैक्षणिक साहित्याचे बक्षीस खुशालद्दिन शेख यांच्यावतीने नुकतेच देण्यात आले आहे.

Distribution of prizes to students
Jalna Crime News : रस्त्यात अडवून वाईन शॉपीच्या मॅनेजरवर गोळीबार; आरोपी फरार

पर्यावरणाच्या संतुलनासाठी तसेच वाढते तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय दुसरा पर्यायच नाही.पर्यावरण संतुलन बिघडल्यामुळे वेळेवर पाऊसही पडत नाही.पर्यावरण संतुलन ठेवण्यास झाड लावणे व ते जगविणे गरजेचे आहे.

या उद्देशाने मागील वर्षी सांगोलकर-गवळीवस्ती येथील प्राथमिक शिक्षक खुशालद्दिन शेख यांनी स्वखर्चातून मुख्याध्यापक सुहास कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त तरंगेवाडी गावात ५०१ वटवृक्षांची लागवड केली होती.

तरंगेवाडी गावातील सांगोलकर-गवळीवस्ती,तरंगेवाडी,बंडगरवस्ती,पवार-कोळेकरवस्ती व गावडेवाडी या पाच शाळांमधील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहयोगातून हे वटवृक्ष शाळा परिसर,विद्यार्थ्यांच्या शेतशिवारात व घराच्या परिसरामध्ये लावण्यात आले होते.

Distribution of prizes to students
Aurangzeb : ओवैसींच्या सभेत औरंगजेबाच्या घोषणा; वातावरण तापल्यानंतर माध्यमांशी बोलणं टाळलं

वटवृक्ष जोपासण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर देण्यात आली होती.जे विद्यार्थी रोपाची उत्तम जपणूक करतील त्यांना सर्व शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात येत अशी घोषणा त्यावेळी श्री.शेख यांनी केली होती.

त्यानुसार तरंगेवाडी येथील या पाच जिल्हा परिषद शाळेमधील रोपांची उत्तम जपणूक करणाऱ्या २१ विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांचा श्री.शेख यांच्यावतीने सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांच्या हस्ते प्रत्येकी एक हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

तरंगेवाडी अंतर्गत असलेल्या सर्व शाळांमधील विद्यार्थी,शिक्षक,पालक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आशा तळे,माजी सरपंच सुरेश गावडे,शरद खताळ,श्रीमंत गावडे,सुशांत शिंत्रे,गणेश व्हनखंडे उपस्थित होते.प्रास्ताविक खुशालद्दीन शेख यांनी केले तर सुत्रसंचालन सुहास कुलकर्णी यांनी केले.

"झाडे जगवा,बक्षीस मिळवा" उपक्रम-

गतवर्षी लागवड करण्यात आलेल्या या वटवृक्षांची पाहणी शिक्षकांनी समक्ष जाऊन केली.तरंगेवाडी येथील प्रत्येक घरासमोर एक वटवृक्ष असून सर्व वटवृक्ष जिवंत आहेत. त्यातून वटवृक्षाची उत्कृष्ट जतन करणाऱ्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची निवड केली.

खुशालद्दिन शेख यांनी पगारातून २१ विद्यार्थ्यांना शाळेचे दप्तर यासह सर्व शैक्षणिक साहित्याचे बक्षीस दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com