

Gadchiroli Etapalli School Van Crash
Sakal
एटापल्ली (जि. गडचिरोली) : तालुक्यातील तोडसा येथील विद्यार्थी एटापल्ली येथे शाळेत घेऊन येत असताना वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वेगाने असलेल्या संस्कार पब्लिक स्कुलच्या व्हॅनचा अपघात झाला. वाहन क्रमांक एम. एच. ३३ व्ही १८०१ या वाहनात पाच विद्यार्थी शाळेत येत होते. अपघात झाल्यानंतर जवळ असलेल्या एटापल्ली ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित होते.