छिंदवाडा मार्गावर अचानक पेटली स्कूलव्हॅन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

केळवद (जि. नागपूर): सावनेरच्या एका शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी येत असलेल्या स्कूलव्हॅनला अचानक आग लागल्याने वाहन पूर्णत: जळून खाक झाले. ही घटना नागपूर-छिंदवाडा मार्गावरील मंगसा गावानजीक घडली. वाहनात विद्यार्थी नसल्याने व वेळेवर चालकाने समयसूचकता दाखविल्याने यात जीवहानी झाली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, सावनेर येथील सारस्वत पब्लिक स्कूलचे वाहन सकाळी नऊ वाजताच्या सुमारास केळवदकडे येत असताना नागपूर-छिंदवाडा महामार्गावरील परसोडी शिवारात भारत पेटोल पम्पसमोर वाहनाने अचानक पेट घेतला. वाहक व चालकाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढल्याने त्यावर नियंत्रण मिळविणे अशक्‍य झाले. यात वाहन जळून खाक झाले. घटनेनंतर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी वाहनचालकाविषयी नाराजी व्यक्त केली. तर शाळेने नियमित वाहनांची तपासणी केल्याशिवाय प्रवासाची परवाणगी देऊ नये अशी मागणी केली. या प्रकरणाची केळवद पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास केळवद पोलिस करीत आहेत. 
शाळेचा पुढाकार आवश्‍यक 
आग लागल्याची घटना विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती होताच त्यांनी शाळेच्या प्रशासनाकडे याबाबतची तक्रार केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळेने पुढकार घ्यायला हवा असे मत नोंदविले. वाहन जळत असताना महामार्गावर बघ्यांची गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाबाबत असा प्रश्‍न केला जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School van suddenly burnt on Road