शिक्षकांअभावी एटापल्ली तालुक्यातील अनेक शाळा शाळा बंद

मनोहर बोरकर
बुधवार, 25 जुलै 2018

एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील नक्षल प्रभावी व अतिदुर्गम भागातील अनेक शाळा शैक्षणिक सत्र सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी झाला असुनही सुरु झाल्या नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून रिक्तपदी शिक्षकांची त्वरीत नियुक्ती करून बंद शाळा सुरु करण्याची मागणी जिल्हापरिषद सदस्य सैनु गोटा यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी यांनी निवेदनातून केली आहे.

तालुक्यात अकरा केंद्रे असून 198 शाळांमध्ये 466 शिक्षकांची पदे मंजूर आहेत यातील 395 शिक्षक कार्यरत असून 71 पदे रिक्त आहेत. यातील सर्वाधिक गट्टा केंद्रातिल 29, कचलेर केंद्रातिल 19, सुरजागड 8 व कसनसुर 4 तसेच इतर केंद्रातिल शिक्षकांची पदे रिक्त आहेत गट्टा, कचलेर व सुरजागड ही शालेय केंद्रे नक्षलप्रभावी व अतिदुर्गम भागातील असून चालू शैक्षणिक सत्र सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी झाला. मात्र दुर्गम भागातील शाळांना गेल्या सत्रात एक मे पासून उन्हाळी सुट्टी लागल्याने लागलेले कुलुप उघडलेच नाही, त्यामुळे विद्यार्थी रोज शाळेत येऊन शिक्षक येतील व शाळा उघडतील अशी प्रतिक्षा करुन आल्या पावली परत जातात. यात शालेय विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत असून जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल घेऊन त्वरीत बंद शाळा सुरु करण्याची मागणी ग्रामसभा अध्यक्ष तथा जिल्हापरिषद सदस्य सैनु गोटा व पालकांनी केली आहे.

तालुक्यात मंजूर शिक्षक पदापैकी 71 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यातील बहुतांश दुर्गम भागातील असून आवश्यक ठिकाणी शिक्षकांचे समायोजन करून शाळा सुरु करण्यात येत आहे.
- नरेंद्र कोकुडे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली

Web Title: schools are close down because of no teachers available in etapalli gadchiroli