अल्पसंख्याक शाळा "रुबेला'पासून दूर! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

नागपूर : पंधरा वर्षांपर्यंतच्या प्रत्येक मुलाचे मिझल्स-रुबेला लसीकरण व्हावे, हे ध्येय ठरवून केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन करीत असतानाच उपराजधानीत अल्पसंख्याक समाजाच्या शाळा गैरसमजामुळे या लसीकरणापासून अद्यापही दूर आहेत. महापालिका नेहमीप्रमाणेच गैरसमज दूर करण्यात नापास झाली असून याचा फटका लसीकरण मोहिमेला बसला. गांधीबाग परिसरातील एका शाळेत शुन्य टक्के लसीकरणाची नोंद केली गेली. दुसऱ्या एका शाळेत अवघे 5 टक्के लसीकरण झाले. सहा शाळांमध्ये 15 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक लसीकरण होऊ शकले नाही, हे वास्तव आरोग्य उपसंचालक कार्यालयात आयोजित बैठकीतून पुढे आले. 

उपराजधानीत 1,433 शाळांमध्ये लसीकरण सुरू झाले. मात्र 316 शाळा या लसीकरण मोहिमेपासून अद्याप दूर आहेत. नाताळाच्या सुट्यांमुळे या शाळांमध्ये अद्याप मोहीम सुरू झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शहरातील गांधीबाग, नेहरूनगरसह इतर झोनमध्ये असलेल्या अल्पसंख्यांकाच्या शाळांमध्ये लसीकरणाला हरताळ फासला गेला आहे. 
इस्लामीया उर्दू शाळेत 536 विद्यार्थी शिकत असून एकाही विद्यार्थ्याला लस दिली नाही. दरम्यान महापालिकेने काही दिवसांपूर्वी येथे पालकांचे समुपदेशन केल्यावर काही प्रमाणात लसीकरण झाल्याचा दावा महापालिकेचा आरोग्य विभाग करीत आहे. मलिक स्कूल, ताजाबाद उर्दू शाळा, इस्लामिया हास्कूल, मार्गादिया उर्दू हायस्कूल, रशेदीया उर्दू हायस्कूल, ब्ल्यू डायमंड प्राथमिक शाळांसह इतरही काही अल्पसंख्याक विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये 9 ते 15 टक्के मुलांचे लसीकरण झाले. नॅशनल उर्दू शाळा, मलिक उर्दू शाळा, सुयश कॉन्व्हेंट, आशीर्वाद उर्दू स्कूल, एम. एम. ताज, ताजबाग महापालिका उर्दू शाळा, नजमा पब्लिक स्कूल, इकरा पब्लिक स्कूल, बिडीपेठ उर्दू स्कूल, तायबा कान्व्हेंट, डोबीनगर उर्दू स्कूलसह इतरही अनेक शाळांत 16 ते 50 टक्के लसीकरण झाले. 

गैरसमज ठरले कारणीभूत 
अल्पसंख्याक समाजात गैरसमज पसरवणारे व्हिडिओ तसेच संदेश समाज माध्यमाद्वारे पसरविण्यात आले. यामुळेच लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेने काही मुस्लीम धर्मगुरूसोबत बोलून लसीकरणाचे आवाहन करणारे व्हिडिओ तयार केले आहेत. परंतु लसीकरणासाठी अल्पसंख्याक समाजाकडून प्रतिसाद मिळत नाही. या मुलांमध्ये लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी आरोग्य विभाग काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे 

Web Title: schools of Minors are awya from Rubella