एकाच दिवशी 19 "स्क्रब' पॉझिटिव्ह

File photo
File photo

नागपूर : स्क्रब टायफसने उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात थैमान घातले आहे. पूर्व विदर्भात एकाच दिवशी 19 जणांना स्क्रब टायफस आढळून आला आहे. विशेष असे की, यातील 5 जण हे नागपूरच्या गावखेड्यातील आहेत. तर 8 जण नागपूर शहरातील आहेत. मेयो रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेल्या दोन टायफसग्रस्त महिलांचा मृत्यू झाल्याचे माहिती मिळाली आहे. यामुळे मृतांची संख्या 14 वर पोचली आहे.
मेयोत दगावलेल्या महिलेचे नाव चित्रलेखा शाहू (37) असे आहे. ती कळमना येथील रहिवासी आहे. तर दुसरी दगावलेली महिला मध्य प्रदेशातील असून सीमा भलावी (26) असे नाव आहे. बुधवारी स्क्रबचे 19 रुग्ण नव्याने आढळून आल्यामुळे आता लागणग्रस्तांची संख्या 70 वर पोहोचली आहे. तर मेडिकल, मेयोसह भंडारा येथील खासगी रुग्णालयात सुमारे 46 रुग्ण भरती असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या नोंदीत असल्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले. स्क्रब टायफसच्या विळख्यात सापडलेले सह जण मेडिकलमध्ये व्हेंटिलेटवर आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मेडिकलमध्ये स्क्रब टायफसचे एकूण 38 रुग्ण भरती आहेत. याच रुग्णांनी वॉर्ड हाउसफुल्ल झाला आहे. यामुळे अतिरिक्त रुग्ण आढळल्यास त्यांना कोणत्या वॉर्डात ठेवायचा ही चिंता आता मेडिकल प्रशासनाला असून अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी अतिदक्षता वॉर्डात भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
चार वर्षांपासून "पीसीआर'ची प्रतिक्षा
राज्यात 2014 मध्ये स्वाइन फ्लूचा प्रकोप झाल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मेडिकलमध्ये भेट दिली होती. यावेळी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या कक्षात स्वाइन फ्लूबाबत माहिती जाणून घेतल्यानंतर मेडिकल भेटीत चाचणी करण्यासाठी पीसीआर यंत्र देण्याचे आश्‍वासन दिले होते, परंतु चार वर्षांनंतरही मेडिकलमध्ये आरोग्य विभागाकडून व्हेंटिलेटर पोहोचले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com