20 सापळे लावूनही उंदीरमामा सापडेना!

File photo
File photo

नागपूर : चिगर माइट अर्थात सूक्ष्म किड्यांमुळे स्क्रब टायफस होतो, हे सिद्ध झाले. मात्र यात उंदराचा संबंध असल्याचे माफसुने केलेल्या पाहणीत पुढे आले. यामुळे सूक्ष्म किड्यांसह "पिसू किंवा पिसवा' हेदेखील उंदराच्या शरीरावर आढळून येतात. यामुळे पुण्यासोबतच दिल्ली येथील तज्ज्ञांची समिती नागपुरात आली आहे. जलालखेडा आणि कळमेश्वर, काटोल तालुक्‍यातील रुग्णांची संख्या मोठी असल्याने उंदरांना जाळ्यात अडकवण्यासाठी तब्बल 20 सापळे लावले आहेत. परंतु दोन दिवसांपासून एकही उंदीरमामा जाळ्यात अडकला नसल्याची माहिती पुढे आली आहे.
विदर्भात स्क्रब टायफसमुळे दशहत पसरली आहे. याची दखल दिल्लीतील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतली. त्यानुसार काही दिवसांपूर्वी दिल्लीचे एक पथक येऊन गेले. त्यानंतर पुण्याचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. मुकुंद देशपांडे यांच्या नेतृत्वातील पथक दोन दिवसांपूर्वी नागपुरात दाखल झाले. स्क्रब टायफस पसरविणाऱ्या किड्यांसह पिसू (पिसवा)ची डीएनए चाचणी करून त्याचे ऑडिट करण्यासंदर्भात पुण्याच्या एकात्मिक रोग नियंत्रण प्रकल्प (आयडीएसपी) आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय साथरोग नियंत्रण पथक दोन दिवसांपासून नागपुरात आहेत. या पथकाने स्क्रब टायफसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या जलालखेडा, कळमेश्‍वर, काटोल, नरखेड तालुक्‍यांमधील उंदीर पकडण्यासाठी तब्बल 20 सापळे रचले आहेत. मात्र उंदीर सापळ्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत आले नव्हते.
उंदीर वाहक
उंदीर हा आजार पसरविणाऱ्या किड्यांचा वाहक आहे. स्क्रब पसरविणाऱ्या पिसू उंदराच्या केसाळ त्वचेवर आढळतात. त्यामुळेच उंदरांचा अभ्यास करण्यासाठी नवी दिल्ली येथील साथरोग पथकात डॉ. वैशाली वर्धन, डॉ. अभिजित कुमार यांचा समावेश आहे. नागपूरच्या आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. मिलिंद गणवीर (हिवताप), परजिवी शास्त्रज्ञ डॉ. एस. डब्ल्यू कोलते, सेंटर फॉर झुनोसिसचे प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. संदीप चौधरी यांचा समावेश आहे.
स्क्रबग्रस्तांची संख्या 102
नागपूर विभागात सद्या स्क्रब टायफसग्रस्तांची संख्या 102 वर पोहचली आहे. यातील 16 जण दगावले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असली तरी गेल्या दोन दिवसांत मृत्यू झाले नाही. यामुळे आरोग्य विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी आरोग्य विभागाच्या सतर्क आणि फवारणीतून मृत्यूवर नियंत्रण मिळवले असल्याचा दावा केला आहे.
उंदराच्या शरीरावरील पिसू स्क्रबला कारणीभूत ठरत असल्याने पिसूंची डीएनए चाचणी केली जाईल. पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न नागपूर व्हेटरनरी कॉलेजमधील सेंटर फॉर झुनोसिस प्रयोगशाळा पिसूंचे विकृतीशास्त्रीय (पॅथोजिन्स) विश्‍लेषण करेल. उंदीरमामा जाळ्यात सापडल्यानंतर महिनाभर हा अभ्यास चालेल. डॉ. संदीप चौधरी, प्रमुख, सेंटर फॉर झुनोसिस प्रयोगशाळा, नागपूर.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com