अखेर लाखनीच्या तलाठ्याची उचलबांगडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

लाखनी (जि. भंडारा) : उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वृद्धेसह गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याशी अभद्र व्यवहार करून चप्पल उगारणाऱ्या तलाठ्याचे लाखनी येथून स्थानांतरण करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे यांनी दिले. जी. डी. शिवणकर असे त्या तलाठ्याचे नाव आहे.

शेवंता हटनागर ही निराधार वृद्धा उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आठ दिवसांपासून तलाठी कार्यालयात चकरा मारत होती. लाखनी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तितीरमारे यांना सोबत घेऊन ती बुधवारी (ता. 24) कार्यालयात गेली. यावर शिवणकर याने त्यांना शिवीगाळ करून हाकलून लावले तसेच तितीरमारे यांच्यावर चप्पल उगारली होती. या प्रकरणी तितीरमारे व हटनागर यांनी तहसीलदार मल्लिक विराणी यांच्याकडे तक्रार केली होती. हे प्रकरण आणखी चिघळू नये, यासाठी शिवणकर याचे स्थानांतरण लाखांदूर तालुक्‍यातील चप्राड येथे करण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्याने कोणताही विलंब न लावता, दडपण न आणता पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरित रुजू व्हावे; अन्यथा महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1969 नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SDO issue tramsfer order of talathi

टॅग्स