दुसऱ्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

शिरजगावकसबा (जि. अमरावती) : शिरजगावकसबा ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील मुलीला (वय नऊ) खाऊ देण्याचे आमिष दाखवून शाळेच्या पडक्‍या खोलीत नेऊन अनोळखी युवकाने (वय 25) तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी इयत्ता दुसरीत शिकते. सकाळी शाळेत जाण्यासाठी ती घराबाहेर पडली. गावातील सार्वजनिक नळावर पिण्यासाठी पाणी भरत असताना, एक युवक तिच्याजवळ आला. त्यानेच असे कृत्य केल्याचे पीडितेने पालकांना सांगितले. चिमुरडी रडतच एकटी दुपारच्या सुमारास घराकडे परत येताना तिच्या पालकांना दिसली. पालकांनी चौकशी केली असता, तिने घटनाक्रम सांगितला.

शिरजगावकसबा (जि. अमरावती) : शिरजगावकसबा ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील मुलीला (वय नऊ) खाऊ देण्याचे आमिष दाखवून शाळेच्या पडक्‍या खोलीत नेऊन अनोळखी युवकाने (वय 25) तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी इयत्ता दुसरीत शिकते. सकाळी शाळेत जाण्यासाठी ती घराबाहेर पडली. गावातील सार्वजनिक नळावर पिण्यासाठी पाणी भरत असताना, एक युवक तिच्याजवळ आला. त्यानेच असे कृत्य केल्याचे पीडितेने पालकांना सांगितले. चिमुरडी रडतच एकटी दुपारच्या सुमारास घराकडे परत येताना तिच्या पालकांना दिसली. पालकांनी चौकशी केली असता, तिने घटनाक्रम सांगितला. पालकांच्या तक्रारीवरून शिरजगावकसबा पोलिसांनी पसार झालेल्या अनोळखी युवकाविरुद्ध आज, शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी कुणालाही अटक केली नव्हती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second class student tortured