दुसऱ्या दिवशीही एस टी बस पुलावरून नदीपात्रात घसरली 

सचिन शिंदे 
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

आर्णी : तालुक्यातील पहुर ते म्हसोला रोडवर असलेल्या नाल्यावरील पुलावरून सोमवारी (ता.27) पुन्हा एस. टी. बस घसरून नाल्याच्या पात्रात पडली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. 

रविवारी (ता.26) सकाळी 6.45 वाजता आर्णी-म्हसोला बस पुलावरून जात असताना चिखलामुळे नाल्याच्या पात्रात पडली होती. या बसमधील सात प्रवासी जखमी झाले होते. 
या घटनेची चर्चा संपत नाही तोच दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. 27) सायंकाळी सहा वाजता पुन्हा त्याच पुलावरून यवतमाळ पांगरी बस (क्रमांक : एम. एच. 40 एन. 9517) ही बस चालक वाहकासह तीन प्रवासी घेऊन पुलाच्या खाली घसरली.

सुदैवाने जिवित हानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. पुलावर असलेल्या चिखलामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असून बांधकाम विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी वाहनचालकाची व प्रवाशांची मागणी आहे. यापुढे अपघात झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा परिसरातील नागरिकानी दिला आहे.

Web Title: second day ST bus collapsed on the river bank