विजेमुळे सभागृह बंद पडण्याची दुसरी वेळ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

नागपूर - वीज खंडित झाल्याने शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज पूर्ण दिवसासाठी तहकूब करावे लागले. राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचा आरोप विरोधकांतर्फे केला जात आहे. मात्र 1961 साली पावसाळी अधिवेशन नागपूर भरले होते. त्यावेळीसुद्धा वीज प्रवाह वारंवार खंडित होत असल्याने कामकाज स्थगित करावे लागले होते. 

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 1961 साली विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला झाले होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. 23 ऑगस्टला एका विधेयकावर चर्चा सुरू असताना अचानक वीज गेली. आठ मिनिटांनंतर वीज आली. त्यानंतर पुन्हा गेली. त्यामुळे तत्कालीन अध्यक्षांनी सलग दोन दिवस कामकाज स्थगित केले होते. त्यानंतर शनिवार, रविवार सुटी चार दिवसांनंतर अधिवेशनाला सुरुवात झाली होती. त्यानंतर जुलै 2002 ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पोलिसांनी अटक केल्याने शिवसेना सदस्यांनी विधानसभेत गोंधळ घातला होता. अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केल्यानंतर शिवसेना सदस्यांनी खुर्च्यांची मोडतोड केली होती. त्यामुळे दिवसभराचे कामकाज झाले नव्हते. 

सदस्यांनी सोडावा भत्ता 
अधिवेशनादरम्यान प्रत्येक सदस्यांना विशेष भत्ता मिळतो. संसदेत विरोधकांकडून घातलेल्या गोंधळामुळे कामकाज न झाल्याने भाजप सदस्यांनी भत्ता नाकारून आदर्श घडविला होता. शुक्रवारी विधानसभेचेही कुठलेच कामकाज झाले नाही. त्यामुळे एक दिवसाचा भत्ता सदस्यांनी सोडावा अशी मागणी होत आहे. 

Web Title: Second time to shut down the hall due to electricity