सहा वर्षीय मुलीवर सुरक्षा रक्षकाकडून अत्याचार

अनिल कांबळे
सोमवार, 9 एप्रिल 2018

नागपूर : कामठी येथील लष्करी छावणी परिसरात एका सुरक्षा रक्षकाने सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणात पोलिसांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. विलास रामचंद्र वाहुरकर (५०) रा. येरखेडा असे आरोपीचे नाव आहे. 

कामठी येथील कन्टॉनमेंटमध्ये छावणी नगर पिरिषदेचे कार्यालय आहे. त्या कार्यालयांतर्गत पीडित मुलीचे वडील कार्यरत असून छावणी परिसरातच राहतात. तर आरोपी हा त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजता पीडित ६ वर्षीय मुलगी अंगणात खेळत असताना आरोपीने तिला बाजुला उभ्या असलेल्या कारमध्ये बोलवले व तेथे तिच्यासोबत अश्लील चाळे केले.

Web Title: security guard harass a 6 years old girl