सुरक्षा जवानाने लगावली तक्रारकर्त्याच्या कानशिलात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नागपूर : अतिदक्षता वॉर्डात (24) भरती असलेल्या एका रुग्णाचे रक्त काढण्यासाठी सोमवारी (ता.23) खासगी पॅथॉलॉजीचा तंत्रज्ञ येताच त्याला पकडण्याची सूचना येथे तैनात सुरक्षा बलाच्या रक्षकांना केली असता, त्यांनी तक्रार करणाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना पुढे आली. असा अजब कारभार मेडिकलमध्ये सुरू आहे. गरिबांची होणारी लूट कधी थांबेल? हाच सवाल येथील रुग्णाचे नातेवाईक करीत आहेत.

नुकतेच खासगी पॅथॉलॉजीच्या एजंटला मेडिकलमध्ये भरती असलेल्या रुग्णाचे रक्त काढताना पकडण्यात आले. मात्र, लगेच सोडून देण्यात आले. यासंदर्भात मेडिकलच्या अधिष्ठातांनाही निवेदन देण्यात आले. मात्र, अवैधरित्या मेडिकलच्या वॉर्डातून खासगी पॅथॉलॉजीच्या तंत्रज्ञांकडून रक्त तपासणीसाठी काढण्याचे काम थांबले नसून अधिक जोरकसपणे हा गोरखधंदा सुरूच आहे. डॉक्‍टरांच्या सांगण्यावरूनच येथे खासगी पॅथॉलॉजीचे तंत्रज्ञ प्रवेश करतात, हे मात्र निश्‍चित असून येथील सुरक्षा बलाच्या जवानांकडे तक्रार केली असता, त्यांनीही तक्रारकर्त्यालाच कानशिलात लगावले. तक्रारकर्त्याचे नाव राहुल जगदीश असे आहे. येथील सुरक्षा बलाच्या जवानांनी केलेल्या प्रकरणाची तक्रार अजनी पोलिस ठाण्यात करण्यासाठी एका पोलिस अधिकाऱ्याला फोनवरून माहिती दिली असता, त्यांनीही या तक्रारकर्त्यालाच धारेवर धरले यावरून मेडिकलमध्ये सुरू असलेल्या या गोरखधंद्यात कोण-कोण सामील आहेत, हे मात्र आता उघड झाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: security personnel hit complainer