सेल्फी, ब्लॅकमेलिंग अन्‌ गैरवर्तन

Girl
Girl

नागपूर - स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा संचालक राहुल भुसारी याने विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह सेल्फी काढले. त्याच्या मदतीने तो विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून गैरवर्तन करायचा. विरोध करणाऱ्या विवाहित विद्यार्थिनीला त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. धंतोली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

राहुलचे नेताजी फुलमार्केट येथील जानकी कॉम्प्लेक्‍सच्या दुसऱ्या माळ्यावर बी. एस. एज्युकेशन इन्स्टिट्यूट असून, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करतो. अभ्यासासाठी येणाऱ्या मुलींसोबत तो जवळीक साधायचा. 

२६ मे ते २३ नोव्हेंबरपर्यंत त्याने विद्यार्थिनींसोबत जबरदस्तीने फोटो काढले. हे फोटो दाखवून तो विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करायचा. कधीही येऊन गैरवर्तन करीत होता. विवाहित विद्यार्थिनींनी त्याला इशारा देत लांब राहण्याचा इशारा दिला. संतापलेल्या भुसारीने आक्षेपार्ह फोटो पतीला पाठविण्यासह व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या विद्यार्थिनींनी क्‍लासला येणेही बंद केले. परंतु, तो कॉल करून क्‍लासला बोलावू लागला. डोक्‍यावरून पाणी जात असल्याने एका विद्यार्थिनीने धंतोली ठाणे गाठून तक्रार दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com