सेल्फी विथ "पोलिस आयुक्त' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

हिंगणा (जि.नागपूर) : नगरपंचायतच्या वतीने शहरात प्लॅस्टिकमुक्त अभियान प्रारंभ झाले आहे. तहसील कार्यालयात प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला बळ देण्यासाठी "सेल्फी विथ फोटो' असा उपक्रम सुरू केला आहे. मंगळवारी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी "सेल्फी विथ फोटो' काढला. हा फोटो जनजागृतीसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

हिंगणा (जि.नागपूर) : नगरपंचायतच्या वतीने शहरात प्लॅस्टिकमुक्त अभियान प्रारंभ झाले आहे. तहसील कार्यालयात प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला बळ देण्यासाठी "सेल्फी विथ फोटो' असा उपक्रम सुरू केला आहे. मंगळवारी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी "सेल्फी विथ फोटो' काढला. हा फोटो जनजागृतीसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.
हिंगणा नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छ व सुंदर शहर ही संकल्पना समाजात मांडली आहे. यासाठी मुख्याधिकारी डॉ. ऋचा दाबडे यांनी विविध उपक्रम राबवणे सुरू केले आहे. शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याचा उपक्रम त्यांनी मागील महिनाभरापासून हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून कागदी पिशव्या तयार करून घेण्यात आल्या. या पिशव्या दुकानदारांना विकून आलेली रक्कम विद्यार्थ्यांना खरी कमाई म्हणून देण्यात आली. 
विधानसभा निवडणुका असल्याने हिंगणा तहसील कार्यालयात वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. याचा लाभ घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी हिंगणा तहसील कार्यालयातील सर्व प्लॅस्टिक उचलण्याची मोहीम हाती घेण्यात आली. पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बाटल्याही बंद करण्यात आल्या. तहसील कार्यालयात प्लॅस्टिकमुक्त अभियानाची जनजागृती करण्यासाठी सेल्फी विथ फोटो अशी मोहीम राबविण्यात आली. प्लॅस्टिकमुक्त शहर करण्याच्या उद्देशाने जनजागृतीसाठी अनेक वाक्‍य लिहिण्यात आले आहेत. ही वाक्‍य लिहिलेली एक फोटो फ्रेम ठेवण्यात आली आहे. यात आतापर्यंत 50ते 60 विविध अधिकाऱ्यांचे सेल्फी काढण्यात आले आहे. 15 ऑक्‍टोबर रोजी तहसील कार्यालयात पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आले होते. या अभियानाची माहिती मुख्याधिकारी डॉ. ऋचा धाबडे यांनी त्यांना दिली. त्यांचा सेल्फी विथ फोटोही या उपक्रमादरम्यान काढण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक पोलिस आयुक्तांनी केले. वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतल्याबद्दल कौतुकही केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selfie with "Police Commissioner"