esakal | वाड्‌मय पुरस्कारांसाठी पाठवा ग्रंथ 
sakal

बोलून बातमी शोधा

sahitya.jpg

विदर्भातील लेखकांच्या पाच उत्कृष्ट ग्रंथांना हे पुरस्कार देण्यात येतील. याशिवाय दोन नवोदित लेखकांच्या ग्रंथांनाही दरवर्षी पुरस्कृत करण्यात येते.

वाड्‌मय पुरस्कारांसाठी पाठवा ग्रंथ 

sakal_logo
By
मनिषा मोहोड

नागपूर  :  विदर्भ साहित्य संघाच्या वतीने वैदर्भीय लेखकांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या वाड्‌मय पुरस्कारासाठी 1 ऑगस्ट 2019 ते 31 जुलै 2020 या वर्षभराच्या काळात प्रसिद्ध झालेले ग्रंथ पाठविण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघातर्फे करण्यात आले आहे. 
विदर्भातील लेखकांच्या पाच उत्कृष्ट ग्रंथांना हे पुरस्कार देण्यात येतील. याशिवाय दोन नवोदित लेखकांच्या ग्रंथांनाही दरवर्षी पुरस्कृत करण्यात येते. लेखक अथवा प्रकाशक यांनी उपरोक्त कालावधीत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांच्या दोन प्रती आपल्या परिचयासह आणि पासपोर्ट आकाराच्या फोटोंच्या दोन प्रतींसह विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयात "सरचिटणीस, विदर्भ साहित्य संघ, सांस्कृतिक संकुल, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर - 440012 या पत्त्यावर 31 ऑगस्ट 2020 पर्यंत किंवा त्यापूर्वी पाठवाव्यात किंवा कार्यालयीन वेळात ( रविवार व सुटीचा दिवस सोडून सायं 5 ते 7 ) प्रत्यक्ष आणून द्याव्या. "पुस्तकांवर वाड्‌मय पुरस्कारासाठी' असे नोंदवावे. पुरस्कारांसाठी लेखक अथवा प्रकाशकांना अर्ज करण्याची गरज नाही. पुरस्कारांसाठी पाठविल्या गेलेल्या ग्रंथांव्यतिरिक्त अन्य लेखनही तज्ज्ञ परीक्षक पुरस्कारासाठी विचारार्थ घेऊ शकतात याची कृपया नोंद घ्यावी. विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनदिन समारंभात ही पुरस्कार सन्माननीयांच्या हस्ते प्रदान केले जातात. विदर्भ साहित्य संघाच्या आगामी 98 व्या वर्धापनदिन समारंभ गुरुवार 14 जानेवारी 2021 रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. 

हे ही वाचा -  काले मेघा, काले मेघा .... पाणी ताे बरसा, िवदभातील या जिल्ह्यांवर दृष्काळाचे सावट 


पुरस्कार आणि रोख रक्कम 
रुपये 5 हजार रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप राहील. पुरस्कार तज्ज्ञ परीक्षकांनी सुचविलेल्या ग्रंथांसाठी देण्यात येतील. ख्यातनाम वैदर्भीय लेखकांच्या स्मृत्यर्थ असलेले हे पुरस्कार असे कादंबरी 
( पु. य . देशपांडे स्मृती), वैचारिक वाड्‌मय ( म.म.वा.वि.मिराशी स्मृती ), आत्मचरित्र (अण्णासाहेब खापर्डे स्मृती), समीक्षा ( कुसुमानिल स्मृती ), कविता ( शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती ), शास्त्रीय लेखन ( य. खु. देशपांडे स्मृती ), प्रवासवर्णन ( संत गाडगेबाबा स्मृती ), चरित्र ( राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती ), कथा ( वा.कृ.चोरघडे स्मृती ), ललित गद्य ( गो.रा.दोडके स्मृती ), नाट्यलेखन ( गणेश शिवराम उर्फ नाना जोग स्मृती ), बालसाहित्य ( बा.रा.मोडक स्मृती ), संकीर्ण वाड्‌मय ( वा. ना. देशपांडे स्मृती ) व साहित्यशास्त्र किंवा संत साहित्य लेखन ( डॉ.मा.गो.देशमुख स्मृती ) या प्रकारात आपले लेखन पुरस्कारासाठी पाठवावे असे आवाहन संस्थेने केले आहे. 

loading image