esakal | काले मेघा, काले मेघा पानी तो बरसा...विदर्भातील `या` जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट
sakal

बोलून बातमी शोधा

Low rain hits Gondiya, Yavatmal, Akola

दुष्काळाच्या सावटात असलेल्या या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 29, 21 व 18 टक्‍के कमी पाऊस पडला. पावसाळ्याचे अजून अडीच महिने शिल्लक असल्यामुळे ही तूट भरून निघण्याची शक्‍यता आहे.

काले मेघा, काले मेघा पानी तो बरसा...विदर्भातील `या` जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात 1 जूनपासून 8 जुलैपर्यंत एकूण 254.1 मिलिमीटर पाऊस पडला, जो सरासरीइतका (254.3 मिलिमीटर) आहे.

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

विदर्भात सर्वाधिक पाऊस वाशीम जिल्ह्यात झाला. येथे सरासरीच्या (231 मिलिमीटर) 40 टक्‍के अधिक म्हणजेच 324 मिलिमीटर इतका पडला. बुलडाणा जिल्ह्यातही 27 टक्‍के अधिक पावसाची नोंद करण्यात आली. येथे सरासरीच्या (196 मिलिमीटर) 27 टक्‍के अधिक (248 मिलिमीटर) पाऊस पडला.

नागपूर जिल्ह्यात स्थिती समाधानकारक आहे. येथे सरासरीच्या नऊ टक्‍के अधिक पाऊस झाला. नागपूर शहरात मात्र वरुणराजाची चांगलीच कृपा झाली असून, जवळपास चारशे मिलिमीटर पाऊस बसरला आहे. विदर्भात सर्वाधिक कठीण परिस्थिती गोंदिया, यवतमाळ व अकोला जिल्ह्यांची आहे.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

दुष्काळाच्या सावटात असलेल्या या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 29, 21 व 18 टक्‍के कमी पाऊस पडला. पावसाळ्याचे अजून अडीच महिने शिल्लक असल्यामुळे ही तूट भरून निघण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. हवामान विभागानेही यावर्षी देशात सरासरी पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. 

विदर्भात आतापर्यंत सरासरीइतका पाऊस

भारतीय हवामान विभागाने यंदा वर्तविलेला सरासरी पावसाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. विदर्भात आतापर्यंत सरासरीइतका पाऊस पडला असून, वाशीम व बुलडाणा जिल्ह्याने पावसाच्या सरासरीत बाजी मारली आहे. गोंदिया, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस बरसल्याने हे तिन्ही जिल्हे सध्या कोमात आहेत. 

विदर्भातील आतापर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये) 
जिल्हा  सरासरी पाऊस  प्रत्यक्ष पाऊस 
नागपूर        255 मिमी         278 मिमी 
वर्धा           251 मिमी         241 मिमी 
अमरावती   224 मिमी         235 मिमी 
भंडारा        294 मिमी        284 मिमी 
गोंदिया       311 मिमी        221 मिमी 
अकोला       197 मिमी       162 मिमी 
वाशीम        231 मिमी        324 मिमी 
बुलडाणा     196 मिमी        248 मिमी 
यवतमाळ     233 मिमी       183 मिमी 
चंद्रपूर         278 मिमी      288 मिमी 
गडचिरोली     316 मिमी     314 मिमी 

(संपादन ः प्रशांत राॅय)
 

go to top