स्मार्ट सिटीवरून सेनेची मनपावर धडक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सदोष आराखड्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आज महापालिकेवर धडक दिली. प्रकल्पाच्या विरोधात घोषणाबाजी करीत सामान्य नागरिकांची सुनावणी घेतली जात नसल्याचा आरोप शिवसेनेने केला. दरम्यान, चर्चेदरम्यान स्मार्ट सिटी प्रकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी 10 ऑगस्टपूर्वी समाधान काढण्याचे आश्‍वासन दिले.

पूर्व नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्पावरून शिवसेनेने सुरुवातीपासून आक्रमक व विरोधाची भूमिका घेतली. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना प्रकल्पग्रस्त नागरिकांशी चर्चा केली जात नसल्याचा आरोप सेनेने केला आहे. सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख रविनिश पांडे, विधानसभा संघटक गुड्डू रहांगडाले यांनी आज महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शिवसैनिकांनी ठाण मांडत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांच्याशी चर्चेचा आग्रह धरला. मोर्चा रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांनी केवळ सहा जणांच्या शिष्टमंडळाला डॉ. सोनवणे यांच्याशी भेटण्याची परवानगी दिली. पाऊण तासांच्या चर्चेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सोनवणे यांनी 10 ऑगस्टपर्यंत प्रकल्पासंबंधी परिसरात सभा घेऊन नागरिकांचे समाधान करण्याचे आश्‍वासन दिले. आश्‍वासनाची पूर्तता न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seneca strikes on NMC