esakal | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वासुदेव देशमुख यांचे निधन

बोलून बातमी शोधा

Senior social activist Vasudev Deshmukh passes away}

वाचन आणि लेखनप्रिय असणाऱ्या देशमुख काकाजी यांचा जनसंपर्क अफाट होता. त्यांनी वेगवेगळ्या स्तरातील माणसे जोडली होती. बोलका स्वभाव, सर्वांना आपलेसे करून घेण्याच्या वृतीमुळे ते परिसरात प्रिय होते.

vidarbha
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वासुदेव देशमुख यांचे निधन
sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमरावती : वरुड तालुक्यातील चांदस वाठोडा येथील आदर्श शिक्षक, माजी मुख्याध्यापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वासुदेव शामराव देशमुख यांचे शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वार्धक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, जावई, नातू, पणतू असा मोठा आत्पपरिवार आहे.

चांदस वाठोडा परिसरात ते काकाजी म्हणून प्रसिद्ध होते. मनमिळावू स्वभाव, मदतीशील वृत्तीमुळे ते सर्वांमध्ये प्रिय होते. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या जाण्याचे वृत्त कळताच चांदस वाथोडा गावावर शोककळा पसरली आहे. कुठलाही सार्वजनिक उत्सव असो वा कुणाच्या घरी आनंदोत्सव देशमुख काकाजी यांचा त्यात सक्रिय सहभाग ठरलेला होता. कित्येकांना शुभेच्छापर दोन शब्द लिहून देणे, मंगलाष्टक तयार करणे हे त्यांना आवडत असे.

वाचन आणि लेखनप्रिय असणाऱ्या देशमुख काकाजी यांचा जनसंपर्क अफाट होता. त्यांनी वेगवेगळ्या स्तरातील माणसे जोडली होती. बोलका स्वभाव, सर्वांना आपलेसे करून घेण्याच्या वृतीमुळे ते परिसरात प्रिय होते.

चांदस वाठोडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक ते मुख्याध्यापक असा त्यांचा प्रवास होता. ज्ञानदानाबरोबर सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा त्यांनी कायम जपला. काकाजी यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.