अधिवेशनात औषधांचा भार कोणावर?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

नागपूर - अधिवेशनाची चाहूल लागताच राज्यभरातून आलेल्या मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी औषधांचा साठा भरपूर असतो. परंतु, हाफकिनकडे औषध खरेदीचा निधी वळता केल्याने यावर्षी पावसाळी अधिवेशनात औषध खरेदीवर प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे.

नागपूर - अधिवेशनाची चाहूल लागताच राज्यभरातून आलेल्या मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी औषधांचा साठा भरपूर असतो. परंतु, हाफकिनकडे औषध खरेदीचा निधी वळता केल्याने यावर्षी पावसाळी अधिवेशनात औषध खरेदीवर प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे.

दरवर्षी अधिवेशनादरम्यान मेडिकल, मेयो आणि आरोग्यसेवेला शासन जणू धारेवर धरले जाते. परंतु, विद्यमान शासनाने सर्जिकल साहित्यापासून तर औषध खरेदीचे सर्व अधिकार हाफकिनकडे दिले. यामुळे पावसाळी अधिवेशनात आवश्‍यक असलेल्या औषधांची जुळवाजुळव करण्याचे भलेमोठे आव्हान उभे ठाकले आहे. औषधासाठीचा सर्व निधी हा हाफकिनकडे वळता केला आहे. यामुळे अधिवेशनात औषधांची जबाबदारी स्वीकारताना मेयो प्रशासनाला घाम फुटणार आहे. यावर्षी औषध खरेदीची जबाबदारी मेडिकलने स्वीकारावी, अशा चर्चेला ऊत आला आहे. तोडगा काढण्यासाठी नोडल अधिकारीपदाचा कार्यभार आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मानेकर यांच्याकडे सोपविण्यात येतो.

२०११ सालचे स्मरण 
मेयो, मेडिकल आणि आरोग्य विभागात यांच्यात २०११ साली झालेल्या हिवाळी अधिवेशनात औषध पुरवठ्यावरून चांगलेच वादळ उठले होते. मेयोच्या अधिष्ठाता कक्षात वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांच्या उपस्थितीत मेडिकलने औषधांची जबाबदारी स्वीकारावी, असे ठरविले होते. परंतु, पुढे मेडिकलने नकार दिल्याने मेयो व मेडिकल प्रशासनात चांगलीच जुंपली होती. अखेर मेयोनेच औषधं खरेदी केली होती. आता हाफकिनकडे निधी दिल्याने हापकिनने औषध खरेदी करून पाठवावी, असाही सूर आहे.

नागपुरात २८ जून रोजी वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन औषधांचा विषय निकाली लावण्यात येईल. औषधांचा पुरवठा केला जाईल. प्रक्रिया सुरू आहे. 
- डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता-मेयो, नागपूर.

Web Title: session medicine fund