बिबट्याच्या हल्ल्यात सात बकऱ्या ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

व्याहाड खुर्द (जि. चंद्रपूर) : व्याहाड खुर्द ते हिरापूर परिसरात दोन बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सोमवारी राजोलीचक येथे सात, तर हिरापुरातील दोन बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

व्याहाड खुर्द, किसाननगर ते राजोलीचक या मार्गावर झुडपी जंगल आहे. या जंगलाच्या परिसरात दोन बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सोमवारी राजोलीचक येथील गणपत कोपुलवार यांच्या 7 बकऱ्यांना बिबट्याने ठार केले. त्यातील एका बकरीला फस्त केले. रात्री हिरापूर येथे गोठ्यात प्रवेश करून दोन बकऱ्यांना ठार केले. यात बकरी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. किसाननगरातही बिबट्याने प्रवेश केला. येथील गलगट यांच्या कोंबड्या खाण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. मात्र, ते शक्‍य झाले नाही. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. सध्या शेतीचे दिवस सुरू आहेत. मात्र, बिबट्याची दहशत असल्याने शेतकरी, मजुरांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven goats killed in leapord attack