बंद घरांकडे चोरट्यांचे लक्ष; बडनेरा व तपोवन परिसरातून सात लाखांचा ऐवज लंपास

संतोष ताकपिरे
Friday, 27 November 2020

घटनास्थळी ठसेतज्ज्ञांसह श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्‍वान हे घराच्या परिसराच्या आसपास फिरून थांबले. तपोवनच्या योगीराजनगरात गजानन महादेव नागे हे कुटुंबासह अकोला येथे गेले होते. बुधवारी सायंकाळी घरी परतल्यावर घरफोडीची घटना उघडकीस आली.

अमरावती : बडनेरा येथील फॉरेस्ट कॉलनीत पाच लाखांची तर, तपोवनच्या योगिराज कॉलनीत दोन लाखांची धाडसी घरफोडी झाली. गुरुवारी (ता. २६) फॉरेस्ट कॉलनीतील घटना उघडकीस आली.

बडनेरात खंडेलवालनगरात फॉरेस्ट कॉलनी येथील अक्षय बनसोड हे बुधवारी कुटुंबासह यवतमाळ येथे गेले होते. गुरुवारी परतले असता घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. घरातील आतील कपाटे हुसकून चोरांनी धुमाकूळ घातला. सोन्याचे दागिने, अंगठ्या, मंगळसूत्र, कानातील रिंग, नथ, बांगड्या, चेन असे १८० ग्रॅम मौल्यवान दागिने, १५ हजारांची रोख रक्कम असा पाच लाख पंधरा हजारांचा ऐवज लंपास केला.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

घटनास्थळी ठसेतज्ज्ञांसह श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्‍वान हे घराच्या परिसराच्या आसपास फिरून थांबले. तपोवनच्या योगीराजनगरात गजानन महादेव नागे हे कुटुंबासह अकोला येथे गेले होते. बुधवारी सायंकाळी घरी परतल्यावर घरफोडीची घटना उघडकीस आली.

स्वयंपाक घर, बेडरुम, हॉलमधील सामुग्री अस्ताव्यस्त दिसली. सोन्याचे ३० ग्रॅम मंगळसूत्र, ५ ग्रॅमचे टॉप्स, २ ग्रॅमचे रिंग असे ३७ ग्रॅम सोन्याचे दागिने २२० ग्रॅम चांदीचे दागिने आणि ७ हजार रुपयांची रोख रक्कम असा दोन लाख पाच हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरी गेला होता. नागे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - बाबा आमटेंच्या आनंदवनमधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण?

दोन्ही ठिकाणी बंद घरेच लक्ष

बडनेरा येथील फॉरेस्ट कॉलनी गाडगेनगर हद्दीतील योगिराज कॉलनीत झालेल्या घरफोडीची पद्धत सारखीच दिसते. येथे बंद घरांनाच चोरट्यांनी लक्ष केले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven lakh burglary in Amravati