हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड
नागपूर : हॉटेल गंगाकाशीमधील हायप्रोफाइल सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी छापा टाकून रशियन तरुणीसह दलालाला ताब्यात घेतले. शहरात देहव्यापार जोर धरत असून, विदेशी तरुणींची उपराजधानीत मागणी असल्याबाबत "सकाळ'ने वृत्तमालिकेतून प्रकाश टाकला होता. त्यानंतर छाप्यांचे प्रमाण वाढले आहे.

उपराजधानीतील सेक्‍स रॅकेटमागे पोलिस आणि एसएसबीचे असलेले "अर्थपूर्ण' संबंध उघडकीस येत असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे जागे झालेल्या एसएसबीने तीन दिवसांत एम्प्रेस मॉल आणि हॉटेल गंगाकाशी येथे कारवाई केली. चार दिवसांपूर्वी अजनी चौकातील हॉटेल केपीएन येथे दोन रशियन तरुणी देहव्यापार करताना आढळल्या होत्या. सोमवारी रशियन तरुणीला ताब्यात घेतले.
सामाजिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी देहव्यापार सुरू असल्याच्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता तरुणी दलालासह खोलीत ग्राहकाची वाट पाहत बसली असल्याचे दिसले. त्यांच्या चौकशीतून बरीच माहिती पुढे आली आहे. उल्लेखनीय म्हणजे या दलालाने हॉटेलमधील खोली ऑनलाइन बुक केली होती. ग्राहकाशी व्हॉट्‌सऍपद्वारे पैशाचा व्यवहार करीत तरुणीचा फोटो दाखवला. सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी घटनास्थळी आल्याने त्याचा भंडाफोड झाला.
हॉटेलमधील सेक्‍स रॅकेटवरील छापा टाकण्याची ही तिसरी आणि सामाजिक सुरक्षा विभागाची दुसरी कारवाई आहे. याआधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एम्प्रेस मॉलमधील एका सलूनवर छापा टाकून चार मुलींना ताब्यात घेतले होते. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

Web Title: The Sex Racket explosion in Hotel Gangakashi