मुलीवर गुन्हा दाखल व्हावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नागपूर - प्रेयसीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची तक्रार प्रियकर शशांक डोंगरे याने पत्रकार परिषदेत केली. शशांकचे आठ वर्षांपासून युवतीशी प्रेमसंबंध होते. तिनेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून आठ वर्षे लैंगिक शोषण केले. प्रेयसीवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्याने केली होती. या प्रकरणी दै. ‘सकाळ’ने ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. या वृत्तावर महिला, वकील, पुरुष, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला.

नागपूर - प्रेयसीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची तक्रार प्रियकर शशांक डोंगरे याने पत्रकार परिषदेत केली. शशांकचे आठ वर्षांपासून युवतीशी प्रेमसंबंध होते. तिनेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून आठ वर्षे लैंगिक शोषण केले. प्रेयसीवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्याने केली होती. या प्रकरणी दै. ‘सकाळ’ने ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. या वृत्तावर महिला, वकील, पुरुष, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला. युवकाला प्रोत्साहित करणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या, तर अनेकांनी कायद्यावर बोट ठेवून त्यामध्ये योग्य तो बदल करण्याची मागणी केली.

प्रेयसीने केले लैंगिक शोषण

मुलीने तक्रार दिली असती, तर लगेच ‘ॲक्‍शन’ घेऊन मुलाला अटक झाली असती. परंतु, मुलगा असल्यामुळे त्याची भटकंती होत आहे. मुलीवर कारवाई व्हायला पाहिजे. यामुळे सामाजिक वातावरणात परिवर्तन होईल. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागू.
- ॲड. राहुल झांबरे.

संबंधित प्रकरणात दोघांच्या संमतीने प्रेमसंबंध निर्माण झाले. मुलीने कुठेही धमकी दिल्याचा उल्लेख नाही. अशा प्रकरणात पुरुषांवर अत्याचार झाल्यासंदर्भात आतापर्यंत कायद्यात कोणतीही प्रोव्हिजन नाही. महिलांविरुद्ध कायदाही अस्तित्वात नाही. या प्रकरणात जो काही घटनाक्रम आहे, तो केवळ मुलीवर दबाव आणण्यासाठी आहे.
- ॲड. स्मिता सिंगलकर-सरोदे

महिला व पुरुषांमध्ये कायद्याने दुजाभाव केला आहे. त्यामुळे बरेच कायदे महिलांच्या बाजूने झुकलेले आहेत. या प्रकरणात मुलीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी. अनेक प्रकरणांत मुली मुलांना पोलिसांत जाण्याची भीती दाखवून लैंगिक-आर्थिक शोषण करतात. त्यामुळे कायद्यानुसार मुलींवरही कारवाई व्हावी.
-प्रतीक गाडबैल

कायदे महिलांना झुकते माप देणारे आहेत. त्यामुळे अनेक महिला कायद्याचा गैरवापर करतात. शशांकने अत्याचार झाल्यानंतर पुढे येण्याची हिंमत दाखवली. मात्र, अनेक जण पुरुषार्थ जपण्यासाठी महिलांच्या अत्याचाराचे बळी पडतात. महिला लगेच पोलिसांत जाण्याची धमकी देतात. त्यामुळे पुरुष हतबल होतात. या प्रकरणात मुलीवर कारवाई व्हावी.
- योगिता शेंडे

पुरुष आणि महिला कायद्यासमोर सारखेच आहेत. कुणावर अन्याय झाला हे महत्त्वाचे आहे. अन्यायग्रस्ताला मदत किंवा न्याय मिळायला हवा. या प्रकरणातही मुलीवर गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी. अन्यथा अनेक मुली अशाच प्रकारे कायद्याचा गैरवापर करतील.
- गीता दळवी, महिला समुपदेशक.

Web Title: sexual abuse girlfriend crime