अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

वाडी (जि.नागपूर):  एका अल्पवयीन मुलाला रेल्वेत प्रवासादरम्यान बडोदा गुजरातच्या ट्रान्सपोर्टर्सची ओळख महागात पडली. हा युवक ट्रान्सपोर्टर्सच्या लैंगिक अत्याचाराला बळी ठरला. यासंदर्भात आरोपी वाहतूकदार व्यावसायिकाविरोधात या अन्यायग्रस्त युवकाच्या तक्रारीनंतर वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

वाडी (जि.नागपूर):  एका अल्पवयीन मुलाला रेल्वेत प्रवासादरम्यान बडोदा गुजरातच्या ट्रान्सपोर्टर्सची ओळख महागात पडली. हा युवक ट्रान्सपोर्टर्सच्या लैंगिक अत्याचाराला बळी ठरला. यासंदर्भात आरोपी वाहतूकदार व्यावसायिकाविरोधात या अन्यायग्रस्त युवकाच्या तक्रारीनंतर वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
वाडी पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा काही कामानिमित्त रेल्वेने गुजरात येथे जात होता. या प्रवासादरम्यान आरोपी संजय सिंग श्रीरंग सिंग तेवर (वय 37, ई-26, श्रीविजय नगर सोसायटी, बडोदा) याच्याशी ओळख झाली. आरोपी संजय याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्याने वाडीशी संबंध जोडला. या प्रवासादरम्यान आरोपीने अल्पवयीन मुलाचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर या दोघांमध्ये व्हॉट्‌सऍप व फेसबुकवर मैत्री झाली. दरम्यान, आरोपी ट्रान्सपोर्ट व्यवसायानिमित्त सप्टेंबरमध्ये नागपूरला आला. त्याने वाडी नाका परिसरात एका खोलीवर फिर्यादी अल्पवयीन मुलाला भेटायला बोलाविले. या कक्षात त्याच्यासोबत अत्याचार केला. त्याचे फोटो व चित्रीकरणदेखील केले. तक्रारीनुसार 29 जुलै 9 मार्च या कालावधीत ही चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित करण्याची भीती व धमकी देऊन व्यवसायानिमित्त तो नागपूरला यायचा, तेव्हा विविध ठिकाणी जागेची सोय करून युवकाला बोलावून त्याचे लैंगिक शोषण करायचा. या त्रासाला कंटाळून शेवटी या युवकाने वाडी पोलिस ठाणे गाठून पोलिसांना आपबिती कथन केली. पोलिस उपनिरीक्षक जायभाये यांनी तक्रारीची शहानिशा करून आरोपी संजय सिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. रविवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sexual abuse of a minor