सावत्र वडील, भावाचे मुलीशी अश्‍लील चाळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

नागपूर : पहिल्या पतीसोबत घटस्फोट झालेल्या महिलेने हुडकेश्‍वरमध्ये राहणाऱ्या एकाशी दुसरे लग्न केले. ही महिला आपल्या दहा वर्षीय मुलीसोबत या कुटुंबात नांदायला आली. येथे पती, पतीच्या मुलासह पतीच्या मोठ्या भावानेच मुलीसोबत अश्‍लील चाळे केले. पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पतीसोबत घटस्फोट झालेल्या महिलेने दुसऱ्या लग्नासाठी इंटरनेटवरील एका संस्थेत नोंदणी केली. येथे लग्न मोडलेल्या हुडकेश्वर परिसरातील व्यक्तीसोबत तिची ओळख झाली. दोघांनीही मोबाईलवर बोलणे सुरू केले. काही आठवडे सतत बोलणे होऊन दोघांची ओळख झाल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यापूर्वी दोघांनाही त्यांना मुले असल्याचे व तेही सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. ही महिला एका संस्थेत नोकरीवर आहे. लग्नानंतर महिला आपल्या मुलीसह दुसऱ्या पतीच्या घरी राहायला आली. काही दिवसांपूर्वी नोकरीवरून घरी परतल्यावर तिला मुलगी घाबरलेली दिसली. तिने मुलीला जवळ करून आस्थेने विचारपूस केली. त्यावर तिला मुलीने वडील, मोठे वडिलांसह भावाने अश्‍लील चाळे केल्याचे सांगितले. संतप्त महिलेचे घरातील सदस्यांसोबत कडाक्‍याचे भांडण झाले. त्यानंतर महिलेने हुडकेश्‍वर पोलिस ठाणे गाठत तिघांच्याही विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, संतप्त महिलेने या घटनेनंतर हे घर सोडून पुन्हा स्वतंत्र राहणे सुरू केल्याची पोलिसांची माहिती आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sexual relations with stepfather, brother's daughter