गडकरींच्या कामांची शरद पवारांकडून स्तुती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री विदर्भातील आहे. दोन महत्त्वाची खाती विदर्भात असतानाही विदर्भातील रस्त्यांचीस्थिती चिंताजनक आहे. यामुळे ‘खड्डेयुक्त रस्ता‘ असे धोरण सरकारचे असावे अशी शंका कुणाच्याही मनात आल्याशिवाय राहत नाही.

यवतमाळ : नितीन गडकरी यांनी नागपूर आणि परिसरात केलेली कामेच केवळ दिसतात. इतर कुठलेही काम केंद्र किंवा राज्य शासनाने केले असे दिसत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामांची स्तुती केली.

मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री विदर्भातील आहे. दोन महत्त्वाची खाती विदर्भात असतानाही विदर्भातील रस्त्यांचीस्थिती चिंताजनक आहे. यामुळे ‘खड्डेयुक्त रस्ता‘ असे धोरण सरकारचे असावे अशी शंका कुणाच्याही मनात आल्याशिवाय राहत नाही.

शहरातील अंतर्गत रस्त्यांची स्थिती तर अत्यंत खराब आहे. दोन दिवसापासून मी विदर्भदौर्‍यावर असून प्रत्येक जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती अशीच आहे. याला सरकारचे धोरण जबाबदार असल्याची टीका शरद पवार यांनी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar appreciate Nitin Gadkari work in Vidarbha