शरद पवार आज गोंदियात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

गोंदिया : येथील नमाद महाविद्यालयात आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे शनिवारपासून आयोजन करण्यात आले आहे. मुख्य उद्‌घाटन सोहळा रविवारी (ता. 23) होणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या वेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहतील. याशिवाय कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय व मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या वतीने कारंजा परिसरात रिलायन्सचे कॅन्सर केअर हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलचे उद्‌घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

गोंदिया : येथील नमाद महाविद्यालयात आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे शनिवारपासून आयोजन करण्यात आले आहे. मुख्य उद्‌घाटन सोहळा रविवारी (ता. 23) होणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या वेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहतील. याशिवाय कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय व मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या वतीने कारंजा परिसरात रिलायन्सचे कॅन्सर केअर हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलचे उद्‌घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री राजकुमार बडोले, टिना अंबानी, खासदार मधुकर कुकडे, आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी, मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित राहतील.

Web Title: Sharad Pawar today in Gondia