शरद पवार आज काय बोलणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या गुरुवारी (ता. 10) नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी व काटोल येथे प्रचारसभा होणार आहे. विदर्भाच्या तीनदिवसीय प्रचारसभेतील पवार यांचा हा अखेरचा टप्पा आहे. 

नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन उमेदवार आहेत. यात काटोल आणि हिंगणा मतदारसंघाचा समावेश आहे. बुटीबोरी येथे दुपारी अडीच वाजता तर काटोल येथे देशमुख यांच्या प्रचारासाठी चार वाजता सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादीचे उमेदवारांसह माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर, माजी आमदार सुनील शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसह आघाडीतील कॉंग्रेस व पीरिपाचे पदाधिकारी व उमेदवार उपस्थित राहणार आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar in vidharbha