जंगलातून एकटी जात असल्याचे पाहून त्यांच्यातील "पशू' जागा झाला 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

घटनेच्या दिवशी ती आपल्या स्कूटीने जात असताना रेखाटोला ते पुलबोडी जंगलात दोन व्यक्तींनी तिला अडवले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.

गडचिरोली : जंगलातून एकटीच जात असल्याची संधी साधून एका अंगणवाडीसेविकेवर नराधमांनी अत्याचार केल्याची घटना धानोरा तालुक्‍यातील येडनपायली गावालगत शुक्रवारी घडली. या प्रकरणी कारवाफा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 

ती जंगलातील रस्त्याने एकटीच जात होती

पीडित महिला धानोरा तालुक्‍यातील खुटगाव येथील रहिवासी आहे. ती येडनपायली येथील अंगणवाडी केंद्रात कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी ती आपल्या स्कूटीने जात असताना रेखाटोला ते पुलबोडी जंगलात दोन व्यक्तींनी तिला अडवले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे पीडित महिला बेशुद्ध पडली. ती मृत पावली असावी असे समजून दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. 

 

अवश्‍य वाचा-  हिंगणघाटच्या "त्या' दुर्दैवी घटनेतील मृत अंकितावर अंत्यसंस्कार 

 

गुराख्याने वाचविले प्राण

मात्र, काही वेळाने त्याच रस्त्याने येणाऱ्या गुराख्याला ती पडून असलेली दिसली. त्याने लागलीच तिला आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. पीडित महिलेवर नागपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. कारवाफा पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She was going alone through a forest and they raped her