esakal | 'शेट्टी टोळी'चा मजुरांच्या वस्तीत वाढला धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 
sakal

बोलून बातमी शोधा

Sheeti gang demanding for money from common people in chandrapur

शहरातील इंदिरानगर, श्‍यामनगर, रयतवारी परिसरातील झोपडपट्टीत मजूर वर्ग राहतो. याच भागात आंध्र प्रदेश, तेलंगणातील गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसांनीही निवारा शोधला आहे.

'शेट्टी टोळी'चा मजुरांच्या वस्तीत वाढला धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

sakal_logo
By
श्रीकांत पशेट्टीवार

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील झोपडपट्टी परिसरात दहशत माजविणाऱ्या "शेट्टी टोळी' विरोधात मनपाच्या सात नगरसेवकांनी दंड थोपटले आहे. या टोळीच्या उच्छादाने या भागातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या नगरसेवकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली असून शेट्टी टोळीच्या मुसक्‍या आवळण्याची मागणी केली आहे.

शहरातील इंदिरानगर, श्‍यामनगर, रयतवारी परिसरातील झोपडपट्टीत मजूर वर्ग राहतो. याच भागात आंध्र प्रदेश, तेलंगणातील गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसांनीही निवारा शोधला आहे. यातील काहींचे अवैध धंदे आहे. विशेषत "शेट्टी' या आडनावाच्या माणसांचा गुन्हेगारी वर्तुळात चांगलाच दबदबा आहे. चोरी, लुटमार, नागरिकांना मारहाण, दारूचा अवैध व्यवसाय त्यांच्याकडून राजरोसपणे सुरू आहे. 

"कोरोना आला यात आमचा काय दोष"? आयुष्यभराची वेदना सहन करणाऱ्यांचा सवाल; वाचा सविस्तर

त्यांच्या विरोधात बोलणाऱ्याला ते मारहाण करतात. घरावर शस्त्रांसह चालून जातात. त्यामुळे या भागातील माणस त्यांच्या वाटेला फारशी जात नाही. त्यामुळे या टोळीची हिंमत वाढली आहे. अमली पदार्थांच्या नशेत ते लोकांना मारझोड करतात. या टोळीत महिलांचाही समावेश आहे.

तक्रारकर्त्याच्या घरावर या महिला चालून जातात. मारहाण करतात आणि विनयभंग झाल्याची तक्रारही स्वतः:च करतात. दोन दिवसांपूर्वी राहुल कोरे नामक युवक कामावरून घरी येताना शेट्टी टोळीच्या लोकांनी मारहाण केली. त्याने त्यावेळी प्रतिकार केला. त्यानंतर सोमवारला टोळीने त्याच्यावर हल्ला केला. वेळीच वॉर्डातील नागरिक कोरे कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

या टोळी संदर्भात यापूर्वी अनेकदा पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या. पोलिसांनी कारवाई केली. मात्र, तुरुंगातून सुटल्यानंतर या टोळीच्या लोकांनी तक्रारकर्त्यालाच मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या दहशती समोर कुणाची "ब्र' काढण्याची हिंमत होत नाही. मात्र, सोमवारच्या घटनेने लोकांचा संयम सुटला. त्यांच्या मदतीला या परिसरातील सर्वपक्षीय नगरसेवक पुढे आले आहे. 

केळझरच्या टेकडीवरील श्री सिद्धिविनायक; वसिष्ठ ऋषींनी स्थापना केल्याची आख्यायिका

आता या नगरसेवकांनी शेट्टी टोळी विरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. मनसेचे नगरसेवक सचिन भोयर, कॉंग्रेसचे अमजद अली, संगीता भोयर, अपक्ष अजय सरकार, भाजपचे चंद्रकला सोमाय, वंदना जांभूळकर, जयश्री जुमडे, यांनी या शेट्टी टोळीच्या मुसक्‍या आवळण्याची मागणी केली.

संपादन - अथर्व महांकाळ