

Cash Seized from Car by Election Department Shegaon
शेगाव : वरवट बकाल कडून शेगाव कडे येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाचे कीया गाडीमध्ये दहा लाखाची रोकड निवडणूक विभागाच्या एसएसटी पथकाने केलेल्या तपासणी दरम्यान पकडून जप्त केली सदर कार्यवाही ता.१३ रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान स्थानिक गौरव हॉटेल जवळ करण्यात आली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने विविध रस्त्यावर निवडणूक विभागाचे पथक मार्फत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे.