Accident : देवदर्शन करून आनंदाने घरी परतत होत्या सासू-सून पण, काळाने डाव साधला अन् ...

Accident
Accident

शेगाव : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळाचे दर्शन घेऊन शेगावी परत येणाऱ्या भाविकांचे चारचाकीला वाहनाला आज (ता.२२) पहाटे अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Accident
Accident News : शेगाव येथे पंढरपूरहून परणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला! तीन ठार तर सात गंभीर जखमी

आज सकाळी शेगावातील जमजम नगर जवळ ही घटना घडली. भाविकांना घेऊन येणारी क्रुझर जमजम नगर जवळ प्रवेश कमानच्या सिमेंट कॉलमला धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की वाहनातील तिघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा शेगाव सामान्‍य रुग्णालयातच मृत्यू झाला. तर एका महिलेचा अकोला येथे उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.

वाहन चालकाला झोपेची डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. अपघातानंतर परिसातील नागरिकांनी बचाव कार्य करून जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

तालुक्यातील आळसना येथील दत्ता गजानन लांजुळकर यांचे जवळ एमएच- ३७ जी ६१०४ क्रमांकाचे क्रुझर वाहन आहे. दत्ता यांचा लहान भाऊ परशूराम लांजुळकर हा क्रुझरमध्ये शेगाव, जळगाव तालुक्यातील भाविकांना घेऊन (ता.२०) रोजी देवदर्शनाला गेला होता. पंढरपूर येथून दर्शन घेऊन परत येत असताना आपल्या स्वत:च्या गावाच्या प्रवेशद्वारावरच चालकाला डुलकी लागली व ही एक डुलकी चौघांना मृत्यूच्या दारात घेउन गेली.

या अपघातात चालक परशूराम गजानन लांजुळकर ( वय ३० रा. आळसना ) सुनंदा गजानन झाटे ( वय. ४० रा. तरोडा, ता. जळगाव जामोद) शुभांगी सागर झाटे ( वय.३० रा. तरोडा ता. जळगाव जामोद) यांचा शेगावच्या सईबाई मोटे उप जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. गंभीर अवस्थेत अकोला येथे हलविण्यात आलेल्या शितल अक्षय भारंबे यांचा अकोला येथे मृत्यू झाला.

पुर्वी नितीन ठाकरे रा.चिंचखेड, स्वामीनी हरीदास भारंबे रा. मच्‍छींद्रखेड, प्रांजळ दतात्रय पारसकर रा.सावळा, सागर विलास झाटे रा. तरोडा, ज्योती ज्ञानेश्वर भारंबे रा.मच्‍छींद्रखेड, ज्ञानेश्वर वसंता भारंबे रा. मच्‍छींद्रखेड, ओवी अक्षय भारंबे रा. मच्‍छींद्रखेड, श्लोक नितीन ठाकरे रा.चिचखेड, योगीराज सागर झाटे रा. तरोडा, सार्थक अक्षय भारंबे रा.मच्‍छींद्रखेड, अक्षय वसंता भारंबे रा. मच्‍छींद्रखेड, नितीन ठाकरे रा. लोहारा, जिजाबाई वसंता भारंबे रा. मच्‍छींद्रखेड , प्रमिला पाटील यांचा जखमींमध्ये समावेश आहे .

Accident
Sharad Pawar : 'कर्नाटकच्या निकालामुळे निवडणुका लांबणीवर पडू शकतात', आगामी निवडणुकांबाबत पवारांचं भाकीत

जखमीवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून काही जखमींच्या नातेवाईकांनी स्वतःच्या जबाबदारीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु केले आहेत. चालक परशुराम गजानन लांजुळकर (वय ३०) रा. अळसणा याने त्याचे ताब्यातील क्रुझर वाहन क्र एमएच-३७-जी-६१०४ भरधाव वेगाने व निष्काळजीपने चालवून स्वतःचे व चार जणांच्या मरणास व त्याचे वाहनातील प्रवाशांना जखमी होण्यास कारणीभूत ठरला या रिपोर्ट वरून शेगाव पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. परशूराम लांजुळकर यांच्‍यावर अळसणा येथे तर शितल भारंबे यांच्‍यावर मच्‍छींद्रखेड येथे अत्‍यंसंस्‍कार करण्यात आले.

गर्दी आणि आक्रोश

अपघाताच्या घटनेनंतर येथील सईबाई मोटे रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. तर मृतकांच्या, जखमींच्या नातेवाईकांच्या आर्त किंकाळ्यां, आक्रोशाने नागरिक गहिवरून गेले होते. तर यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक थोरात यांचेसह राजकीय पुढाऱ्यांनी देखील घटनास्थळाला व रूग्णालयात भेट दिली व जखमींची विचारपुस केली.

सासु सूनेविना घर सूने..सुने

देवदर्शनाचे पुण्य पदरात घेउन शुभांगी गजानन झाटे ( सुन) व सूनंदा गजानन झाटे ( सासू) घरी परतण्याचा आनंदात होत्या. मात्र, नियतीला हे सुख पाहता आले नाही. अपघातात दोघींचा मृत्यू झाला आणि झाटेंचे घर सूने सुने झाले.

अबोल ओवी.. निःशब्द सार्थक

देवदर्शन करून चिमुकल्यासह आपल्या गावी परतणारे शीतल व अक्षय भारंबे दांपत्य अतीशय आनंदित होते. पण आजच्या अपघाताने होत्याचे नव्हते केले. शीतल अक्षय भारंबे ( वय ३०) यांचा अकोला येथे रूग्णालयात मृत्यू झाल्‍याने ७ महिन्याची ओवी व ६ वर्षाचा सार्थक पासून त्‍यांची आई दुर गेल्‍याने भारंबे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com