Amravati-Pune Express Among Delayed Trains
esakal
शेगाव : शेगाव रेल्वे स्थानकाजवळ पुणे–मुंबई दिशेकडे जाणाऱ्या अप मार्गावरील ओव्हरहेड इलेक्ट्रिक केबल तुटल्याने रविवारी सायंकाळी रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या तांत्रिक बिघाडामुळे अमरावती–पुणे एक्स्प्रेससह विदर्भ एक्स्प्रेस, पुणे–नागपूर मार्गावरील काही गाड्या विविध ठिकाणी खोळंबल्या असून प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.