डोक्‍यावर शिदोरी, पाठीला संघर्ष !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

कामठी (जि.नागपूर) :  डोक्‍यावर शिदोरीचे गाठोडे, पाठीला चिकटलेला शेकडो पिढयांचा संघर्ष तरीही क्रांतीची पहाट दाखविणा-या भीमाचा ओठांवर अखंड गजर करीत देशभरातील लाखों आंबेडकर अनुयायांचे जत्थे 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येथील ऐतिहासिक ड्रगन पॅलेस टेंपल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसरात स्थिरावले. 

कामठी (जि.नागपूर) :  डोक्‍यावर शिदोरीचे गाठोडे, पाठीला चिकटलेला शेकडो पिढयांचा संघर्ष तरीही क्रांतीची पहाट दाखविणा-या भीमाचा ओठांवर अखंड गजर करीत देशभरातील लाखों आंबेडकर अनुयायांचे जत्थे 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येथील ऐतिहासिक ड्रगन पॅलेस टेंपल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसरात स्थिरावले. 
तहानभूक, रोजीरोटी, गावगाडे, कुटूंबकबीला सारे काही मागे ठेवून फक्त भीमाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारों, शेकडों किलोमीटरचे अंतर ओलांडून आलेला भीमसागर जणू ड्रॅगन पॅलेस टेंपल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसरात स्थिरावला. या धम्मदिनी राज्याच्या कानाकोप-यातील भीमसैनिकांचे जसे जमेल तसे अगोदर नागपूर येथील दिक्षाभूमी व नंतर कामठी बौध्द अनुयायांच्या सोयीसाठी संस्था, सामाजिक संगटना, काही सामाजिक संघटनेने जागोजागी अन्नछत्रांची सोय केली होती.अवघा परिसर निळाईने गजबजला आहे. सांस्कृतिक भवन परिसरात गेल्या दोन दिवसांपासूनच गर्दीने फुलून जाण्यास सुरूवात झाली. गॅस सिलिंडरवर बंदी घातल्याने शहरात ठिक-ठिकाणी चुली पेटल्या भोजनदान करणा-या संस्थांना जुनाच प्रयोग नव्याने करावा लागत आहे. नागपूर येथील दीक्षाभूमीवर येणा-या अनुयायांकडून दीक्षाभूमीवर चुली पेटवून जेवण तयार केले जात आहेत. बांधवांना पोटभर जेवण देण्याचे सामर्थ्य नागपूरशहरांसह कामठीमध्येसुध्दा निर्माण झाले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त संपुर्ण कामठी शहरात सर्वत्र भोजनदान होते. 
भीमा तुझया नावाने ! 
गेल्या तीन दिवसांपासून ड्रॅगन पॅलेस टेंपल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्राच्या प्रथम वर्धापन दिनाच्यानिमित्ताने राज्याच्या कानाकोप-यातून अनुयायी आले आहेत. तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, केरळ, बिहार, ओरीसा, छत्तीसगडसह नागालॅंड, मिझोराम, हिमाचल प्रदेशातूनही अनेक धम्मबांधव आलेले आहेत. नंदुरबारहून आलेले महादेव पाटील दरवर्षी दीक्षाभूमीनंतर ड्रॅगन पॅलेस टेंपल येथे येतात व बाबासाहेबांच्या आठवणी ताज्या करीत परततात. जोहरा राठोड या सोलापूरहून आल्या. त्यांच्यासोबत त्यांच्या गावातील अनेक महिला आजही या ठिकाणी मुक्काम ठोकून आहेत. न चुकता, दरवर्षी आल्याशिवाय राहावत नाही, अशा बोलक्‍या प्रतिक्रिया त्या देतात. बुध्द-भीम गीते सादर करणारी एकाहून एक अस्सल कलावंत या दिनाची चातकाप्रमाणे प्रतिक्षा करीत असतात
.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shidori on the head, struggling backwards!