रस्त्यांत वाट बघताहेत यमदूत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

नागपूर - शहरातील अनेक रस्ते रुंद झाले असून, अनेक वीजखांब रस्त्यांच्या मध्यभागी उभे आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. या खांबांमुळे नागपूरकरांवर अपघाताची टांगती तलवार असून, गेल्या चार वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. रस्त्याच्या मध्य भागातील वीजखांबावर आदळून एखाद्याचा बळी गेल्यानंतरच महापालिका मुहूर्त शोधणार काय, असा सवाल आता नागपूरकर करीत आहेत. 

शहरात सुमारे चार हजार किमीचे रस्ते आहेत. आयआरडीपीअंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण झाले. शहर विकास आराखड्यातील रस्त्यांचीही रुंद रस्त्यांत भर पडली. रस्ता रुंदीकरणामुळे नागपूरकरांना वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, रस्ता रुंद केल्यानंतर कधी काळी रस्त्याच्या बाजूला असलेले वीजखांब आता मध्यभागी आल्याने वाहतुकीसाठी मोठा अडथळाच नाही, तर वाहनधारकांवर अपघाताची टांगती तलवारही आहे.

शहरातील रस्त्यांवरील वीजखांब हटविण्याबाबत न्यायालयानेही महापालिकेला सुनावले होते. मात्र, महापालिका महावितरणवर तर महावितरण महापालिकेकडे बोट दाखवीत आहे. महावितरणने महापालिकेला आयआरडीपी रस्त्यांवरील खांब काढण्यासाठी ५० टक्के खर्च दिल्याचे समजते. इतर रस्त्यांवरील खांब काढण्याचा खर्च न दिल्याने महापालिका व महावितरणमधील वादही उभ्या खांबांसाठी जबाबदार ठरल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचीही आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने रस्त्यांच्या मध्यभागी वीजखांब वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरले आहेत. शहरातील त्रिशरण चौक ते शताब्दी चौकापर्यंत नवीन सिमेंट रोड तयार झाला. परंतु, एका बाजूने वीजखांब मध्यभागी असल्याने दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. असाच प्रकार शहरातील अनेक रस्त्यांवर दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वर्दळीच्या भागात वाहतूक कोंडी 
शहरात जुना भंडारा रोड, महाल, इतवारी, शांतीनगर, प्रेमनगर, गांधीबाग, मानेवाडा रोड, रामेश्‍वरी रोडवरून २४ तास वाहतुकीची वर्दळ असते. इतवारी, महाल, गांधीबाग शहरातील मुख्य बाजारपेठेचा परिसर आहे. या भागात रस्त्यांवर वीजखांब असल्याने एखादा दुचाकी किंवा चारचाकी वाहनधारक त्यावर आदळण्याची शक्‍यता आहे. या भागात वीजखांबांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे.

Web Title: shitalamata temple road accident danger