शिवसेनेच्या हाती भोपळा?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

नागपूर : युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार आधी मित्रपक्षांना जागा वाटप केल्या जातील. उर्वरित भाजप-सेना आपसात वाटून घेणार आहे. मात्र भाजप जिंकलेल्या जागा सोडणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. त्यामुळे आता जिल्ह्यात शिवसेनेला एकही जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले.महाजनादेश यात्रेसाठी नागपूरमध्ये आले असता मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी युतीचा फॉर्म्युला सांगितला. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातून एकही शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला नाही. त्यापूर्वी युतीत असलेल्या सर्वच मतदारसंघांत भाजपचे उमेदवार निवडून आले आहे.

नागपूर : युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार आधी मित्रपक्षांना जागा वाटप केल्या जातील. उर्वरित भाजप-सेना आपसात वाटून घेणार आहे. मात्र भाजप जिंकलेल्या जागा सोडणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. त्यामुळे आता जिल्ह्यात शिवसेनेला एकही जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले.महाजनादेश यात्रेसाठी नागपूरमध्ये आले असता मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी युतीचा फॉर्म्युला सांगितला. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातून एकही शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला नाही. त्यापूर्वी युतीत असलेल्या सर्वच मतदारसंघांत भाजपचे उमेदवार निवडून आले आहे. त्यात जिल्ह्यातील रामटेक व काटोल तर शहरातील दक्षिण नागपूरचा समावेश आहे. शिवसेनेतर्फे या जागा परत मागितल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसैनिकांमध्ये असंतोष उफाळून येण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्री म्हणाले, खूपच गरज असेल तर त्या जागांवर आम्ही शिवसनेसोबत चर्चा करू. त्या बदल्यात दुसऱ्या जागा घेऊ.युती असतानाही शिवसेनेला रामटेकचा अपवाद वगळता जिल्ह्यातून आजवर एकही जागा जिंकता आलेली नाही. रामटेकमधून आशीष जयस्वाल दोनवेळा जिंकून आले आहेत. मात्र युती तुटल्यानंतर मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. येथे भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी विजयी झाले. जयस्वाल सध्या खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आहेत. काटोल शिवसेनेच्या कोट्यात होते. मात्र अनिल देशमुख यांना हरवणे शिवसेनेच्या उमेदवाराला कधीच जमले नाही. मागील निवडणुकीत मात्र भाजपच्या आशीष देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. दक्षिण नागपूरमधून किशोर कुमेरिया दोनदा लढले. मागील निवडणुकीत किरण पांडव उमेदवार होते. त्यानंतरही सेनेला ही जागा जिंकता आली नाही. येथे भाजपचे सुधाकर कोहळे आमदार आहेत. काटोल आणि मध्य नागपूरच्या जागेवरचा हक्क शिवसेनेने आधीच सोडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena