शिवसेनेचे गुलाबराव गावंडे राष्ट्रवादीत 

श्रीकांत पाचकवडे -सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 17 डिसेंबर 2016

अकोला - वऱ्हाडाच्या राजकारणात वेगळे अस्तित्व निर्माण करून गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक तयार करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेत सुरू असलेल्या घुसमटीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला. गुलाबरावांनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र' केल्याने शिवसेनेत लवकरच पक्षांतराचा भूकंप येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

गुलाबरावांनी शिवसेनेचे वादळ पश्‍चिम विदर्भात आणले. शिवसेना जिल्हा प्रमुखपदाची धुरा सांभाळताना त्यांनी अकोला, वाशीम जिल्ह्यांतील ग्रामीण भाग पिंजून काढत घरोघरी शिवसैनिकांची फौज तयार केली. त्यामुळे वऱ्हाडाच्या राजकारणात गुलाबरावांचा दबदबा तयार झाला. मात्र गत चार-पाच वर्षांपासून गुलाबरावांचे पक्षांतर्गत विरोधक वाढत गेले. शिवसेनेतील अंतर्गत धुसफुशीमुळे गुलाबरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर आता शिवसेनेत पक्षांतराचा भूकंप येणार असल्याची चर्चा आहे. 
अकोला महापालिकेतील तीन नगरसेवक, अकोला पंचायत समितीमधील चार सदस्यांसह जिल्हा परिषदेतील दोन सदस्य गुलाबरावांचे समर्थक आहेत. ते सर्व लवकरच राष्ट्रवादीत जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. गुलाबरावांचे पुत्र आणि युवासेनेचे जिल्हा प्रमुख संग्राम गावंडे यांच्यासह युवा सेना व शिवसेनेतील काही उपजिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अकोल्यात जाहीर सभा होत असून, त्या सभेकडे संपूर्ण वऱ्हाडचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Shiv Sena Gulabrao Gawande enters ncp