कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा धडक मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

भंडारा (साकोली) - कर्जाच्या पाशात फसलेल्या शेतकऱ्यांची सरकारने कर्जमुक्ती करून सुटका करावी, या मागणीसाठी बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी धडक मोर्चा काढला. यावेळी उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

भंडारा (साकोली) - कर्जाच्या पाशात फसलेल्या शेतकऱ्यांची सरकारने कर्जमुक्ती करून सुटका करावी, या मागणीसाठी बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी धडक मोर्चा काढला. यावेळी उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. त्यामुळे कुटुंब चालविताना त्यांची दमछाक होत आहे. मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न कसे करावे, याची चिंता त्यांना आहे. अल्पश: आजारावर औषध घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे राहत नाही. अनेकांनी शेती परवडत नसल्याने शेतजमीन विकून दुसऱ्यांची गुलामगिरी सुरू केली. शेतीसाठी घेतलेले कर्ज संपण्याचे नावच घेत नाही. त्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून घरदार व पत्नीचे दागिने विकण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवत आहे. चिंताग्रस्त होऊन शेतकरी आत्महत्या करण्याच्या घटनेत सातत्याने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या सरकारला आता कर्जमाफी देण्याचा विसर पडला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी. शेतमालाला योग्य भाव द्यावा. कृषिपंपासाठी शेतकऱ्यांना 24 तास वीज द्यावी, आदी मागण्यांसाठी त्वरित घोषणा करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. 

या मोर्चात शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख संजय रेहेपाडे, राजेश बुराडे, संदीप वाकडे, पुरुषोत्तम सोनवाने, भरत वंजारी, युवासेना जिल्हाप्रमुख मुकेश थोटे, वाहतूक सेनाप्रमुख दिनेश पांडे, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख अमित मेश्राम, जिल्हा विद्यार्थी सेना जितेश ईखार, जिल्हा कार्यकारणी सचिव ओमेश्वर वासनिक, तालुकाप्रमुख प्रकाश मेश्राम, हंसराज अगाशे, अरविंद बनकर, राजू ब्राह्मणकर, माजी तालुकाप्रमुख नरेश करंजेकर, प्रमोद मेंढे, शहरप्रमुख सूर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, नरेश बावनकार, युवासेना तालुकाप्रमुख प्रणय कांबळे, किशोर चन्ने, शुभम बरापात्रे, विभागप्रमुख हितेश बडवाईक व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. 

Web Title: Shiv Sena rally for debt relief