Shiv Sena UBT Akola City Chief Rahul Karale Attacked
esakal
अकोला : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अकोला शहरप्रमुख राहुल कराळे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न रविवारी रात्री झाला. यात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर तलवार व हातोड्याने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी काही तासातच चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.