औरंगाबादेत शिवसेनेचा हिंदूशक्ती मोर्चा 

योगेश पायघन 
शनिवार, 19 मे 2018

औरंगाबाद : 'दंगेखोरांना अटक व हिंदूंना सुरक्षेची हमी द्यावी', या मागणीसाठी शिवसनेने पोलिस परवानगी नसतानाही शनिवारी (ता. 19) शहरातून शांततेत हिंदूशक्ती मोर्चा काढला. मोर्चाच्या सुरुवातीस अटक व सुटका करण्यात आली. मोर्चा सरस्वती भुवन प्रशालेच्या मैदानावर वळवुन तेथे समारोप करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. दरम्यान, पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

औरंगाबाद : 'दंगेखोरांना अटक व हिंदूंना सुरक्षेची हमी द्यावी', या मागणीसाठी शिवसनेने पोलिस परवानगी नसतानाही शनिवारी (ता. 19) शहरातून शांततेत हिंदूशक्ती मोर्चा काढला. मोर्चाच्या सुरुवातीस अटक व सुटका करण्यात आली. मोर्चा सरस्वती भुवन प्रशालेच्या मैदानावर वळवुन तेथे समारोप करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. दरम्यान, पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

सकाळी दहा वाजेपासुन मोर्चेकरी पैठणगेट परिसरात जमत होते. मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चाला बारा वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. पोलिस आयुक्त तीन उपायुक्त, पोलिस अधिकाऱ्यांसह, एसआरपीएफ, वज्र, वरुण, दंगा काबु पथक, क्‍युआरटी कमांडोची तगडा बंदोबस्त या भागात होता. त्यामुळे तर पैठणगेटला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. दरम्यान दहाच्या सुमारास तासभर मोबाईल सेवा बंद करण्यात आली होती. तर पोलिस मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेणार याची चर्चा असल्याने पोलिसांनी निर्माण केलेले दबाव तंत्र कामी आले. 

टिळक पथवरुन मोर्चा सरस्वती भुवन शाळेच्या मैदानावर नेण्यात आला. तिथे सर्वांचे लक्ष लागलेल्या हिंदु शक्ती मोर्चाचा शांततेत समारोप झाला. मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेऊन सरस्वती भुवन प्रशालेच्या प्रांगणात आणुन मोर्चाचा समारोप झाल्यानंतर सुटका करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त विनायक ढाकणे यांनी सांगितले. 
यावेळी शिवसेना नेते खासदार  चंद्रकांत खैरे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार संजय शिरसाट, महानगरप्रमुख प्रदिप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, जितेंद्र महाराज, आंधळे महाराज, राजु वैद्य, बाळासाहेब थोरात, विकास जैन, ऋषिकेश खैरे, सचिन खैरे, ऋषिकेश जैस्वाल यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीप्रमाणे हिंदूंचे रक्षण शिवसेनेचे कर्तव्य असुन आम्ही तेच बजावले. आमच्या घरावर दगड फेकले तर गप्प बसणार नाही. शिवसेनेनी केलेली मदत लक्षात ठेवा. आमच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी हिंदुशक्ती मोर्चाला मार्गदर्शन करतांना केले. दंगलीत पेट्रोल, डिझेल, रॉकेल पुरवणारा एमआयएमचा नगसेवक मतीन याला सध्याकांळपर्यत अटक करा. तर राजेंद्र जंजाळ, लक्ष्मीनारायण बाखरियासह अटकेतील हिंदु युवकांची सुटका करा अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात केली. शिवसैनिकांना सोडवण्यासाठी वकीलांची फौज उभी करू, तुम्ही काही काळजी करू नका आम्ही दंगल घडवली नाही, तर प्रतिकार करून हिंदूचे रक्षण केले. यापुढे सगळ्यांनी सर्तक आणि जागृक राहा, त्यांच्याकडे पेट्रोल, रॉकेलचे बॉम्ब असतील पण आपल्याकडे हिंदूंच्या एकतेची वज्रमुठ असल्याचे खैरे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: shiv sena's hindusakti morcha in aurangabad