Shiva Sharma Murder Case
esakal
शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य आरोपी श्रद्धा दुबे हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल ११ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर नागपूरमधील वर्धा रोड परिसरातील चिंचभवन येथून तिला ताब्यात घेण्यात आलं. उत्तर प्रदेश एसटीएफच्या वाराणसी युनिटने आणि लखनऊ कमिशनरेटच्या पोलिसांनी नागपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. श्रद्धासोबत तिची बहीण रश्मी दुबे आणि चालक तन्वीर यालाही अटक करण्यात आली आहे. नागपूर क्राइम ब्रँचचे डीसीपी दीपक अग्रवाल यांनी श्रद्धाच्या अटकेला दुजोरा दिला आहे.